बालसंस्कार (संकेतस्थळ)

'बालसंस्कार' डॉट कॉम (Balsanskar.com) या संकेतस्थळची सुरुवात गुढीपाडवाच्या शुभमुहूर्तावर दिनांक १६ मार्च २०१० रोजी करण्यात आली . हे संकेतस्थळ मराठी भाषेत उपलब्ध आहे. हे संकेतस्थळ गुरुपौर्णिमेच्या मुहूर्तावर हिंदी भाषेत आणि गणेशचतुर्थीच्या मुहूर्तावर इंग्रजी भाषेत , कृष्ण जयंतीला कन्नड भाषेत सुरू करण्यात आले.आदर्श आणि सुसंस्कारित पिढी हेच देशाचे भवितव्य ! हे या संकेतस्थळाचे ब्रीदवाक्य आहे.

बालसंस्कार डॉट कॉम
ब्रीदवाक्य आदर्श आणि सुसंस्कारित पिढी हेच देशाचे भवितव्य !
प्रकार संकेतस्थळ
उद्योग क्षेत्र अंतरजाल (इंटरनेट)
स्थापना १६ मार्च २०१० (गुढीपाडवा)
मुख्यालय मुंबई, महाराष्ट्र, भारत
संकेतस्थळ बालसंस्कार डॉट कॉम

संकेतस्थळ.

संपादन

इंटरनेटच्या म्हणजेच मायाजालाच्या या विश्वात मुलांसाठी विविध संकेतस्थळे उपलब्ध आहेत. विविध दूरचित्रवाहिन्या, तसेच विविध संस्था आणि मंडळे मुलांच्या व्यक्तीमत्त्व विकासासाठी विविध उपक्रम राबवत आहेत. असे असतांना या संकेतस्थळात वेगळे ते काय ? त्यातच आणखी एक नवीन भर ? असा प्रश्न नक्कीच उपस्थित होतो.

मुलांचा व्यक्तीमत्त्व विकास करणे म्हणजे त्यांचे अंतरंग विकसित करणे होय. विकासासाठी मुलांमध्ये प्रामाणिकपणा, वक्तशीरपणा, नम्रता यांसारख्या नैतिक मूल्यांची ओळख होणे, एवढा एकच उद्देश नसून त्याचे संवर्धन होणेही महत्त्वाचे आहे. खरेतर आपली संस्कृती एवढी महान आहे की, त्यातील विविध गोष्टी, राष्ट्रपुरुषांची उदाहरणे, धर्मशास्त्रात सांगितल्याप्रमाणे केले जाणारे आचरण यांप्रमाणे कृती केली आणि ते गुण आपल्यात आणण्याचा प्रयत्न केला, तरी खऱ्या अर्थाने व्यक्तीमत्त्व विकसीत होईल.

`आदर्श नेहेमी स्फूर्ती देतात', असे म्हणले जाते. आज मुलांपुढे चित्रपट अभिनेते, राजकारणी यांसारखे आदर्श आहेत. `द्रष्टा दृष्यवशात् बद्ध:' या सुभाषिताप्रमाणे दूरचित्रवाहिन्या आणि अन्य माध्यमे यांद्वारे चंगळवाद, भ्रष्टाचार, हाणामारी यांचे बालमनावर आक्रमण होत आहे. नकळत तेच संस्कार त्यांच्या अंतर्मनावर कोरले जात आहेत. सध्याच्या एकत्र कुटुंबपद्धती नसलेल्या, व्यस्त आणि अत्यंत धकाधकीच्या जीवनात पालकांनाही प्रत्येक दिवशी मुलांसाठी पुरेसा वेळ देणे कठीण होत आहे. अशा वेळी मुलांचे पालकत्त्व नेमके कोणी घ्यायचे आणि हा संस्काराचा भाग कोणी मुलांवर रुजवायचा अन् सातत्याने बिंबवायचा, हा एक प्रश्नच असतो.

या सर्व बाबींचा विचार केल्यानंतर संकेतस्थळाची आवश्यकता लक्षात आली आणि आम्ही या क्षेत्रात उतरलो. `मुलांना केवळ माहिती देणे', असा या संकेतस्थळाचा मर्यादित उद्देश नसून खऱ्या अर्थाने व्यक्तीमत्त्व विकास होण्यासाठी संकेतस्थळावर विविध सदरे देण्यात आली आहेत. व्यक्तीमत्त्व विकास म्हणजे शारीरिक, मानसिक आणि बौद्धिक अशा स्तरांवर मर्यादित न, त्याही पुढे जाऊन आध्यात्मिक स्तरावरही होणे गरजेचे आहे. आपल्याला सर्वोच्च आणि सातत्याने मिळणारे सुख म्हणजेच आनंद केवळ अध्यात्मशास्त्रच मिळवून देऊ शकते. यासाठी त्यातील अंगांची येथे मांडणी केली आहे.

हे सर्व जाणून घेऊन व्यक्तीमत्त्व विकास खऱ्या अर्थाने व्हावा आणि आपली वाटचाल आनंदप्राप्तीच्या दिशेने व्हावी, ही ईश्वरचरणी प्रार्थना ! असे झाल्यास या संकेतस्थळाचा उद्देश खऱ्या अर्थाने साध्य झाला, असे आम्ही समजू.

आपल्या सहकार्याची आवश्यकता !

संपादन

सध्या मराठी भाषेत प्रसिद्ध झालेले लेख आम्ही हिंदी, इंग्रजी आणि कन्नड भाषेत भाषांतर करीत आहोत. मनुष्यबळ मर्यादित असल्याने आम्हाला आपल्या सहकार्याची आवश्यकता आहे. आपण या भाषांचे जाणकार असाल किंवा ह्या भाषा आपल्याला चांगल्या प्रकारे येत असतील तर आपण या संकेतस्थळावरील प्रसिद्ध झालेले लेखांचे भाषांतर करून आम्हाला आमच्या baalsanskar@gmail.com या संगणकीय पत्त्यावर पाठवावेत.

संकेतस्थळाच्या मार्गिका पुढीलप्रमाणे आहे.

संपादन

मराठी भाषा : www.balsanskar.com/marathi

हिंदी भाषा : www.balsanskar.com/hindi

इंग्रजी भाषा : www.balsanskar.com/english

कन्नड भाषा : ww.balsanskar.com/kannada