बालचित्रवाणी ही शासकीय शैक्षणिक तंत्रज्ञान संस्था होती. हिला भारत सरकारकडून एप्रिल २००३पर्यंत अनुदान मिळत होते. जून १९८४मध्ये मुंबईत स्थापन झालेली ही संस्था १४-११-१९८६ रोजी पुण्यात आली. ही संस्था पुणे विद्यापीठाशी संलग्न आहे. ही संस्था शालेय विद्यार्थ्यांसाठी दृक्‌श्राव्य प्रणाली तयार करत असे.

बालचित्रवाणीमध्ये ध्वनिचित्रमुद्रण करण्यासाठी व ऐकण्या-बघण्यासाठी आणि संकलन करण्यासाठी अत्याधुनिक साहित्य आणि सुसज्ज यंत्रणा होती. ही यंत्रणा व आधुनिक कॅमेरे असल्याने बालचित्रवाणीमधून मुलांसाठी ३० वर्षांमध्ये सहा हजारांहून अधिक दर्जेदार कार्यक्रमांची निर्मिती झाली.

आर्थिक टंचाईमुळे ही संस्था २०१७मध्ये बंद झाली.

पुण्यातील बालचित्रवाणी बंद करण्याचा निर्णय महाराष्ट्र राज्य सरकारने घेतल्यानंतर महाराष्ट्र राज्य सरकारच्या शालेय शिक्षण विभागाने याबाबतचा जीआर काढला. .बालचित्रवाणीऐवजी आता ई- बालभारती ही नवी संस्था स्थापन करण्यात येणार आहे. मूळच्या बालचित्रवाणीतील सर्व कर्मचाऱ्यांना कार्यमुक्त करण्यात आले.

[]

संदर्भ आणि नोंदी

संपादन
  1. ^ "पैसे नसल्याने बालचित्रवाणी बंद". 2017-05-31 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2017-05-31 रोजी पाहिले.