बारीपाडा (धुळे)
बारीपाडा हे महाराष्ट्रातील धुळे जिल्ह्यात व साकरी तालुक्यात असणारे एक गाव आहे. हे आदिवासीबहुल गाव आहे. या गावानंतर गुजरात राज्याचा डोंगराळ असलेला डांग जिल्हा आहे. या गावाची लोकसंख्या सुमारे ७०० इतकीच आहे व या गावात सुमारे १०० घरे आहेत. या गावात एकही दोन मजली ईमारत नाही. त्याशिवाय, गावातील ग्रामपंचायत सभागृह व शाळेची ईमारत सोडली तर एकही सिमेंटने बांधलेली इमारत नाही. या गावात चौथ्या वर्गापर्यंत शिक्षणाची सोय आहे व गावातील प्रत्येक विध्यार्थ्याला शिक्षणासाठी शाळेत जाणे अनिवार्य आहे. शाळेत गैरहजर राहणाऱ्या शिक्षकांना रु. ५०००/- दंड केल्या जातो.[ संदर्भ हवा ]
गावाची वैशिष्ठ्ये
संपादनया गावात सर्व सिमेंटचे रस्ते आहेत व योग्य तऱ्हेने नाल्या काढण्यात आलेल्या आहेत.गावात गेल्यास कुठेही घाण व काडीकचरा आढळत नाही.ग्रामपंचायतीत अंगणवाडी सेविका / ग्रामसेवक यांचे मोबाईल नंबर भिंतीवर लिहून ठेवण्यात आले आहेत तसेच, कोणत्या शासकीय योजनेचा किती निधी आला याचीपण माहिती तेथे बघावयास मिळते.तेथील प्रशासन स्वच्छ आहे.[ संदर्भ हवा ]
या गावाने सुमारे ११०० एकर जंगल राखले आहे व त्याची सर्व गावकरी काळजी घेतात. या जंगलातील व परिसरातील जैवविविधतेची मागील ९ वर्षांपासून नोंद ठेवणारे हे बहुदा महाराष्ट्रातील एकमेव गाव असावे.यामुळे या गावातील गावकऱ्यांना विशेषत्वाने एलपीजी गॅस देण्यात आलेले आहेत.[ संदर्भ हवा ]
या गावात मागील दहा वर्षांपासून रानभाज्यांची पाककला स्पर्धा घेण्यात येते.त्यासाठी त्या परिसरातील सुमारे १००० नागरिक तेथे जमतात. आलेल्या नागरिकांना अत्यंत माफक दरात जेवण देण्यात येते.या भागात प्रसिध असा इंद्रायणी तांदूळ पिकतो.[ संदर्भ हवा ]