बापू बिरू वाटेगांवकर (१९२२: मु.पो.बोरगांव ता.वाळवा जि.सांगली मृत्यू:१६ जानेवारी, २०१८ ,आधार हास्पिटल इस्लामपूर). हे अन्यायाविरोधात गुन्हेगारी क्षेत्राकडे वळले होते.[ संदर्भ हवा ] त्यांचा जन्म एका गरीब कुटुंबात झाला होता. बोरगांवातील रंगा शिंदे हा गोर-गरिबांना त्रास देत असे. गावातील स्त्रियांची छेड काढत असे. बापू बिरू वाटेगावकरांनी त्याची हत्या केली. रंगाच्या भावानेही (आनंदा शिंदे) असाच उच्छाद मांडला, तेंव्हा बापू बिरु वाटेगावकरांनी त्याचीही हत्या केली.बापूंना अटक करण्यासाठी अनेक प्रयत्न करूनही ते पकडले न गेल्याने पोलिसांनी बापू बिरु वाटेगावकरांच्या कुटुंबाला त्रास देण्यास सुरुवात केली.

बापू बिरू वाटेगावकर यांचे समाजकार्य

संपादन

२५ वर्षे सह्याद्रीच्या डोंगर रांगामंध्ये राहून बापू बिरु वाटेगावकरांनी गरीबांना मदत केली. अन्यायाविरुद्ध लढताना बापू बिरु वाटेगावकर पोलिसांपासून पळतच राहिले आणि कृष्णा-खोरे दहशतीच्या विळख्यातून मुक्त केल्यावर एके दिवशी आपल्या लढयाला पूर्णविराम देऊन त्यांनी पोलिसांसमोर बिनशर्त शरणागती पत्करली. भारतीय घटनेनुसार बापू बिरू वाटेगावकर वर कित्येक खुनांच्या मालिकेचे गुन्हे दाखल झाले आणि त्यांना 'जन्मठेपेची' शिक्षा सुनावली. शिक्षा भोगून ते गावी परतले आणि त्यांनी उर्वरित आयुष्य भजन, कीर्तन आणि प्रवचनात व्यतीत केले. तंबाखू, सिगारेट व दारू अशा व्यसनांच्या आहारी जाऊन भरकटणारी तरुण पिढी वाचविण्यासाठी ते गावोगावी प्रवचने करत. बापू बिरु वाटेगावकरांनी हुंडा पद्धतीला विरोध करत कित्येक लेकी-सुनांचे नांदणे बसवले, कित्येकांची कर्जे मुक्त केली, कित्येकांच्या जमिनी सोडवून दिल्या यासाठी वेळप्रसंगी त्यांनी बंदूकही चालविली.

अगदी त्यांच्या स्वतःच्या मुलाने (तानाजी वाटेगावकर) पर-स्त्रीचे अपहरण केल्यावर त्यालासुद्धा त्यांनी गोळी घालून ठार केले.

असे म्हणतात की बापू बिरू वाटेगावकर फरारी असताना कुख्यात चंदनतस्कर "वीरप्पन" ने त्यांना बोलावून घेतले आणि त्याच्या टोळीत सामील होण्यास सांगितले, यावर बापू बिरू वाटेगावकर गरजले.. "तू एक तस्कर आहेस पैशासाठी तू जनावरे मारून तस्करी करतोस आणि मी सर्व-सामान्यांसाठी हाती शस्त्र घेतले आहे. आपले मार्ग वेगवेगळे आहेत."

बापू बिरू वाटेगावकर यांचे निधन

संपादन

दिनांक १६ जानेवारी 2018 रोजी इस्लामपुरातल्या 'आधार हास्पिटल' येथे वयाच्या 96 व्या वर्षी बापू बिरू वाटेगावकरांचे निधन झाले.

बापू बिरू वाटेगावकर यांचा सन्मान

संपादन
  • "बोरगांवचा ढाण्या वाघ" हा किताब
  • त्यांच्या जीवानावर आधारित "बोरगावचा ढाण्या वाघ" नावाने सिनेमा निघाला आहे. त्यात मिलिंद गुणाजीने बापूंची भूमिका केली आहे.
  • त्यांच्या जीवनावर ’कागल तुरुंगातला कैदी - बापू बिरू वाटेगावकर’ नावाचे नाटक आहे. नाटकाची निर्माती विठा भाऊ मांग यांची मुलगी--मंगला बनसोडे हिने केली होती.
  • बापू बिरु वाटेगावकरांच्या पावलावर पाऊल टाकत एका गुन्हेगाराने तुरुंगातून पलायन केले होते, ही कथा एका बातमीचा विषय होती.
  • हैद्राबाद येथील बलात्कार झाला होता तेव्हा बापूची सर्वात जास्त आठवण काढली गेली.