बाजूबंद हा दंंडामध्ये घालण्याचा दागिना आहे.[]सोने किंंवा चांंदीमध्ये मोती जडवून हा दागिना तयार करतात.[]आता जास्त प्रमाणात बाजूबंद मोत्यांचे असू शकतात.हा अलंकार खांदा आणि हाताचा कोपरा यादरम्यान घालतात.[][]



इतिहास

संपादन
 
केयूर

पूर्वी दंडात घालण्याच्या दागिन्यात अंगद व केयूर हे दोन दागिने प्रमुख आहेत. ही भूषणे स्त्री- पुरुष दोघेही वापरीत.[] हे अलंकार रत्नजडित सुवर्णाचे असत. यांतल्या काहींचा आकार लतेसारखा व काहींचा मकरासारखा असून वरची बाजू टोकदार असे. म्हणून हे अलंकार घालणारी व्यक्ती त्याचे वरचे टोक आपल्या उत्तरीय वस्त्रात अडकवणार नाही, अशी काळजी घेई. काहीच्या दोन्ही तोंडास सिंहाचे किंवा अन्य कोणत्या तरी पशूचे मस्तकही घडविलेले असते .केयूर हा अलंकार जडावाचा केलेला असतो तो मुख्यत्वे उजव्या दंडात घट्ट बसवितात.केयूरला सोबत गोंडा असतो. तो नसला की त्याला अंगद म्हणतात.[]


स्वरूप

संपादन

पूर्वीच्या अंगद व केयूर या बाहुभूषणाप्रमाणे बाजूबंद हे आता वापरात असलेले बाहुभूषण आहे.एक पट्टी असते व त्याचा मध्यभागी गोल फुलासारखी नक्षी असते. व त्याफुला वर एक माणिक सारखे बसवलेले असते.त्याला बांधण्यासाठी दोरी असते.

 
बाजूबंद

हा फक्त हृदयाचीच कार्यक्षमता वाढवत नाही तर खांदा व हात यांना जो वेदनांचा त्रास होतो, त्यापासून सुटका करतो. बाजूबंद घालणारी स्त्री संयमी बनते, असे मानले जाते.[]


संदर्भ

संपादन
  1. ^ Avasthī, Mohan (1978). Hindi-Ritikavita aura samakalina Urdu-kavya (हिंदी भाषेत). Sarsvati Press.
  2. ^ Shirgaonkar, Varsha S. (2001). Peśavyāñce vilāsī jīvana. Kônṭinenṭala Prakāśana.
  3. ^ Kulakarṇī, Kr̥shṇājī Pāṇḍuraṅga (1993). Marāṭhi vyutpatti kośa. Nirali Prakashan. ISBN 978-81-86411-21-6.
  4. ^ Mehendale, Yashavant Shridhar (1969). Mānavaśāstra: Anthropology: social & cultural.
  5. ^ SANT, INDIRA (2016-06-01). MALANGATHA : BHAG 2. Mehta Publishing House. ISBN 978-81-8498-677-8.
  6. ^ जोशी, महादेवशास्त्री (२००० (पुनर्मुद्रण)). भारतीय संस्कृती कोश खंड १. पुणे: भारतीय संस्कृती कोश मंडळ प्रकाशन. |year= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)
  7. ^ "दागिने आणि आरोग्य". http://bookstruck.in. 2018-03-28 रोजी पाहिले. External link in |website= (सहाय्य)[permanent dead link]