बांगलादेश क्रिकेट संघाचा श्रीलंका दौरा, २०२०-२१
(बांगलादेश क्रिकेट संघाचा श्रीलंका दौरा, २०२० या पानावरून पुनर्निर्देशित)
बांगलादेश क्रिकेट संघाने एप्रिल - मे २०२१ दरम्यान दोन कसोटी सामने खेळण्यासाठी श्रीलंकेचा दौरा केला. कसोटी मालिका २०१९-२१ विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेअंतर्गत खेळवली गेली. वेळेपत्रकानुसार ही मालिका ऑगस्ट २०२० होणार होती. परंतु कोरोनाव्हायरसच्या फैलावामुळे मालिका पुढे ढकलण्यात आली.
बांगलादेश क्रिकेट संघाचा श्रीलंका दौरा, २०२०-२१ | |||||
श्रीलंका | बांगलादेश | ||||
तारीख | २१ एप्रिल – ३ मे २०२१ | ||||
संघनायक | दिमुथ करुणारत्ने | मोमिनुल हक | |||
कसोटी मालिका | |||||
निकाल | श्रीलंका संघाने २-सामन्यांची मालिका १–० जिंकली | ||||
सर्वाधिक धावा | दिमुथ करुणारत्ने (४२८) | तमिम इक्बाल (२८०) | |||
सर्वाधिक बळी | प्रवीण जयविक्रमा (११) | तास्किन अहमद (८) तैजुल इस्लाम (८) | |||
मालिकावीर | दिमुथ करुणारत्ने (श्रीलंका) |
नियोजनानुसार दौऱ्यात एकूण तीन कसोटी सामने खेलविळे जाणार होते, परंतु १९ मार्च २०२१ रोजी वेळापत्रक जाहीर करताना श्रीलंका बोर्डाने एक कसोटी कमी करत दोन कसोटींसह सामन्याचे वेळापत्रक प्रसिद्ध केले. पहिली कसोटी अनिर्णित राहिली तर दुसरी कसोटी २०९ धावांनी जिंकत श्रीलंकेने कसोटी मालिका १-० ने जिंकली.
सराव सामने
संपादनदोन-दिवसीय सामना:बांगलादेश लाल वि बांगलादेश हिरवा
संपादन२०१९-२१ विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धा - कसोटी मालिका
संपादन१ली कसोटी
संपादनवि
|
||
- नाणेफेक: बांगलादेश, फलंदाजी.
- पावसामुळे पाचव्या दिवशी शेवटच्या सत्रातला खेळ होऊ शकला नाही.
- विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धा गुण : श्रीलंका - २०, बांगलादेश - २०.
२री कसोटी
संपादनवि
|
||
- नाणेफेक: श्रीलंका, फलंदाजी.
- प्रवीण जयविक्रमा (श्री) आणि शोरिफुल इस्लाम (बां) या दोघांनी कसोटी पदार्पण केले.
- विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धा गुण : श्रीलंका - ६०, बांगलादेश - ०.