बांगलादेश-भारत सीमा

(बांग्ला: বাংলাদেশ-ভারত সীমান্ত) भारत आणि बांगला देश यांच्यामधी सुमारे 4096 कि.मी. इतकी आंतरराष्ट्रीय सीमा आहे. भारतातून बांगला देशात सुमारे ५४ नद्या वाहतात. अनेक ठिकाणी नदी हीच् सीमा धरली आहे. परंतु नद्या मार्ग बदलाने या सीमा बदलत्या राहिल्या.

भूसीमा करारसंपादन करा

१ ऑॅगस्ट २०१५ रोजी भारत-बांगला देश भूसीमा कराराची अंमलबजावणी झाली. भारताच्या सीमेतील सुमारे ७११० एकर क्षेत्रफळाचे बांगला देशचे ५१ कसबे आणि बांगला देशच्या सीमेअंतर्गत १७१६० एकर जमीन व्यापलेले सुमारे १११ भारतीय कसबे बांगला देशात समाविष्ट करण्यात आले. या कसब्यांत कोणत्याही देशाच्या नागरिकत्वाशिवाय राहणाऱ्या सुमारे पन्नास हजार नागरिकांना कायमस्वरूपी आणि त्यांच्या पसंतीच्या देशाचे नागरिकत्व मिळाले. भूभागांची अदलाबदल केल्याने भारताला आपल्या सीमेवर काटेरी कुंपण घालता येऊन बांगला देशी घुसखोरीवर मोठया प्रमाणावर नियंत्रण आणणे शक्य होणार आहे. सीमा निस्चित झाल्याने १५ जून रोजी भूतानची राजधानी थिंपू येथे भारत-नेपाळ-भूतान आणि बांगला देश यांच्यात झालेल्या मोटार वाहने (वाहतूक) कराराची अंमलबजावणी करणे शक्य झाले.