बहुमजली पीक पद्धत अथवा 'अनेक मजली पीक पद्धत' ही पिके घेण्याची एक पद्धत आहे. यामध्ये पीकांची उंचीनुसार लागवड केली जाते. सर्वप्रथम जास्त उंचीची, नंतर मध्यम उंचीची, व त्याखालोखाल कमी उंचीची अशी पिकांची लागव ड केली जाते.अशी पिके एकाच जमिनीवर घेतली जातात.[]

फायदे

संपादन

या पीक प्रकारामुळे, प्रखर उष्णता मानवत नसलेल्या पिकांना फायदा होतो. अशा पिकांची योग्य प्रकारे वाढ अ अधिक उत्पादन येण्यासाठी त्यांना सावली गरजेची असते.या पद्धतीमुळे एका पिकाद्वारे दुसऱ्या पिकास फायदा होतो.एकाच जमिनीवर वेगवेगळी पिके घेता येतात व वर्षभर उत्पादम मिळत राहते. पिक-मशागतीवरील खर्च कमी होतो. मजूरीचा पुरेपूर वापर करता येतो.पिकांचे किडींपासून पिकांचे रक्षण होते.[]

संदर्भ

संपादन
  1. ^ a b तरुण भारत, कृषी भारत पुरवणी "शंका समाधान" Check |दुवा= value (सहाय्य). २-०२-२०१९ रोजी पाहिले. |ॲक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)