पूर्वीच्या काळी मुख्यत: राजे लोक, उमराव, सरदार इत्यादी मंडळींना एक, दोन, तीन,....अकरा, बारा..अशा अनेक लग्नाच्या बायका असत. राजे लोकांना राज्य सांभाळण्याबरोबरच त्याचा विस्तार करण्यासाठी जवळची माणसे लागत, तेव्हा लग्नामुळे नातीगोती वाढत जाऊन नवनवीन माणसे जोडली जात. काही लोक पहिल्या पत्नीला मुल नसल्याने दुसरी करतात, त्यामुळे तो बहुपत्नीक होतो.