बसराई हे एक विकसित केलेले केळीचे वाण आहे.१९२४ साली प्रादेशिक फळ संशोधन केंद्र पुणे येथे हे वाण विकसित केले गेले. या वाणाची उत्पादनक्षमता जास्त असते. हे वाण बंची टॉंप रोगास प्रतिकारक आहे. बसराई वाणाचे झाड हे बुटके असते. याच्या फळांना थोडा बाक असतो. याचे घड हे आकाराने मोठे असतात.