बफेलो अमेरिकेच्या वायोमिंग राज्यातील छोटे शहर आहे. जॉन्सन काउंटीचे प्रशासकीय केन्द्र असलेल्या या शहराची लोकसंख्या २०१० च्या जनगणनेनुसार ४,५८५ होती.

Buffalo Wyoming Occidental Hotel.JPG

शेती आणि पर्यटन या गावातील मुख्य व्यवसाय असून २०१० च्या दशकात येथून जवळ सापडलेल्या मिथेन वायूच्या साठ्यांमुळे त्याच्याशी निगडीत व्यवसायही सुरू झालेले आहेत.