बनगरवाडी

व्यंकटेश माडगूळकर यांनी लिहिलेले पुस्तक

बनगरवाडी हे व्यंकटेश माडगूळकर यांनी २१ सप्टेंबर १९५५ साली लिहिलेले पुस्तक आहे. नोव्हेंबर २०१४ रोजी ह्या पुस्तकची २७वी आवृत्ती प्रकाशित केली आहे.

कथानक संपादन

'बनगरवाडी'तून व्यंकटेश माडगूळकरांची प्रयोगशीलता प्रत्ययास येते. रुढ अर्थाने ह्या कादंबरीला कथानक नाही. बनगरवाडी नावाच्या ह्या लहानशा गावातील सामूहिक जीवनाचे विविधांगी चित्रण तीत केलेले आहे. तेथील उजाड व निष्पर्ण सृष्टी, तेथील कंगालपणा, दुष्काळ, तेथील सण, उत्सव, रूढी, परंपरा, श्रद्धा, संकेत, तेथील रहिवाशांच्या जीवनांतील चढउतार ह्यांना जिवंत शब्दरूप लाभले आहे. येथे कोणी विशिष्ट व्यक्ती नायक वा नयिका नाही. बनगरवाडी ह्या गावालाच नायकत्व देण्यात आलेले आहे.बनगरवाडीच्या परीसरात पडणारा दुष्काळच या कादंबरीतला नायक आहे. कारण या दुष्काळाभोवतीच बनगरवाडीचे कथानक फिरताना दिसते. इंग्रजी, डॅनिश ह्या भाषांतून ही कादंबरी अनुवादिली गेली आहे. (इंग्रजी- द व्हिलेज हॅडनो वॉल्स, डॅनिश-Landsbyen).