Aloo Paratha
Aloo Parantha(Stuffed Indian Bread)

साहित्य

संपादन
  • गव्हाचे पीठ
  • २ मध्यम आकाराचे शिजलेले बटाटे
  • १ चमचा लसूण पेस्ट
  • १ ते दीड चमचा हिरव्या मिरच्यांचा ठेचा
  • पाऊण वाटी बारीक चिरलेली कोथिंबीर
  • १ चमचा जिरे
  • १ लहान चमचा जिरेपूड
  • मीठ
  • बटर
  1. २ ते अडीच वाट्या गव्हाचे पीठ (कणीक) मळून घ्यावे. चवीसाठी मीठ घालावे.
  2. शिजलेले बटाटे किसून घ्यावेत त्यामुळे बटाट्याच्या गुठळ्या होणार नाहीत. त्यात लसूण पेस्ट, मिरची ठेचा, कोथिंबीर, जिरे, जिरेपूड आणि मीठ मिक्स करावे.
  3. कणीक आणि बटाट्याचा कीस यांच्या मिश्रणाचे मध्यम आकाराचे एकसारखे गोळे करावे.
  4. ४ इंच गोल पोळी लाटून त्यात बटाट्याच्या मिश्रणाचा एक गोळा मध्यभागी ठेवावा आणि पोळीची बाकी टोके मध्यभागी आणून बटाट्याचे मिश्रण पूर्ण कव्हर करावे (पुरणपोळीला जसे स्टफिंग करतो तसे).
  5. पोळपाटावर थोडे गव्हाचे पीठ लावावे. आणि हलक्या हाताने पराठा लाटावा. तवा गरम करावा आणि मगच पराठा त्यावर टाकावा. बटर किंवा तेलावर हा पराठा दोन्ही बाजूंनी नीट भाजावा.
  • पराठ्यात लसणाऐवजी अगदी बारीक चिरलेला कांदासुद्धा घालता येतो..
  • पीठ अगदी सैल मळू नये, किंचित घट्टच असावे.

साचा:एकत्रिकरण।आलू पराठा