बगलकलम
विकिपीडियाचा दर्जा राखण्यासाठी या लेखास किंवा विभागास विकिकरणाची गरज आहे. उपयुक्त विकिदुवे देऊन या लेखाचे विकिकरण करण्यास कृपया मदत करा]. संक्षिप्त मार्गदर्शन दाखवा
|
बगलकलम (side grafting) खोड न छाटता - या कलमाची पद्धत क्राऊनग्राफ्ट प्रमाणे असते. या पद्धतीत क्राऊनग्राफ्ट प्रमाणे सर्व झाड कापून त्यात जातिवंत जातीच्या पाचरी बसवत नाही , तर झाड तसेच ठेवून त्याच्या खोडावर खुंट्या क्राऊनग्राफ्ट पद्धतीने बसवतात. त्यामुळे जर कलमफांद्या वा खुंट्या जगल्या नाहीत तर पुन्हा बसवता येतात व त्या जगल्यावरच खुंट झाडाचा भाग काढून टाकतात , त्यामुळे क्राऊनग्राफ्टमध्ये जर कलमफांदी जगली नाही तर झाड वाया जाते तसे या पद्धतीत होत नाही. अलीकडे आंबाच्या बाबतीत याच पद्धतीचा वापर करतात. जिल्हापरिषदा व सरकार याच पद्धतीने रायवळ आंब्याचे रूपांतर जातिवंत झाडात करीत आहेत. मात्र या पद्धतीत यश मिळण्याकरिता कलम करणाऱ्याला चांगले कसब हवे. कलमफांद्या योग्य निवडल्या पाहिजेत. व योग्य हंगामात ही पाचरकलमे बसवायला हवीत. जर ही पद्धत मोठ्या प्रमाणात घेतली तर अनेक निकृष्ट रायवळ आंब्याचे जातिवंत आंब्यात रूपांतर करता येईल.