फ्लोरिन (चलन)
फिरेंझेचा फ्लोरिन तथा फिओरिनो द'ओरो हे तेराव्या ते सोळाव्या शतकाच्या मध्यापर्यंत इटली व युरोपमध्ये चलनात असलेले सोन्याचे नाणे होते. १२५२मध्ये पहिल्यांदा तयार झालेल्या या नाण्याच्या वजन, धातूसंघटन किंवा त्यावरील चित्रांमध्ये कोणतेही मोठे बदल झाले नाहीत.
प्रत्येक फ्लोरिन ३.४९९ ग्रॅम (०.११२५ ट्रॉय औंस किंवा ४३ ग्रेन) शुद्ध सोन्याचा असे. [१] याच्या मूल्याचा अंदाज लावणे कठीण आहे परंतु प्रत्येक फ्लोरिन सुमारे ११,८०० ते ८४,००० रुपयांपर्यंतचा असल्याचे समजले जाते. याच्या एका बाजूला नेहमी फिरेंझे शहराचे प्रतीक असलेले जिलियो बोत्तोनातो हे फूल असे. [२]
१२५२मध्ये पहिल्यांदा पाडलेल्या फ्लोरिनचे मूल्य तत्कालीन लिरा या चलनाला १:१ इतके होते. १५०० सालापर्यंत हे वाढून फ्लोरिन आणि लिरामधील विनमय दर १:७ इतका झाला होता. [३]
संदर्भ
संपादन- ^ Bernocchi, Mario (1976). Le monete della repubblica fiorentina. III. Leo S. Olschki Editore. p. 66.
- ^ Bazzicchi, Oreste (2011). Il paradosso francescano tra povertà e società di mercato. Effatà Editrice. p. 98. ISBN 978-88-7402-665-4.
- ^ Hollingsworth, Mary (2017). "A Note to the Reader". The Medici (इंग्रजी भाषेत). Head of Zeus. ISBN 978-1-78669-151-4.