फेमिनिस्ट थॉट : अ मोअर कॉम्प्रिहेन्सिंग इंट्रॉडक्शन (पुस्तक)

स्त्रीवादी सिद्धांकन निर्माण करणाऱ्यामध्ये विविध स्त्रीवादी विचारप्रवाहांचे योगदान आहे. सदर पुस्तक फेमिनिस्ट थॉट : अ मोर कॉम्प्रिहेन्सिंव इंट्रॉडक्शन[][] याच्या आजतागायत चार आवृत्या प्रकाशित झाल्या आहेत. यामध्ये विविध स्त्रीवादी विचारप्रवाहांची ओळख करून दिली आहे. स्त्रीवादाचे विविध विचारप्रवाह हे काळाच्या भिन्न टप्प्यांवर उदयाला आले. वेगवेगळ्या स्त्रीवादी प्रवाहांनी आपापल्या परिप्रेक्ष्यातून स्त्रीवादी सिद्धांकनाची निर्मिती केली आहे. लिंगभाव, पितृसत्ता, लैंगिकता, सामाजिक व्यवस्था अशा महत्त्वाच्या संकल्पनांची चिकित्सा करण्याचे काम स्त्रीवादी सिद्धांकनातून झाले. स्त्रीवादी चळवळ, महत्त्वाचे असे तत्कालीन स्त्रीवादी लेखन यांचा देखील आढावा स्त्रीवादी सिद्धांकनाच्या अनुषंगाने घेतला आहे.

पुस्तकाच्या लेखिका रोझमेरी टॉंग[] या स्त्रीवादी लेखिका असून १९७० च्या दशकापासून त्यांनी स्त्रीवादी विचार, सिद्धांकन आणि बायो-एथिक्स या ज्ञानक्षेत्रामध्ये मोठे योगदान दिले आहे. यासोबतच स्त्रिया, त्यांचे आरोग्य, आरोग्य विषयक सार्वजनिक धोरणे आणि जिव-वैद्यकशास्त्र अशा महत्त्वाच्या विषयांवर त्यांचे काम आहे.

स्त्रीवादी विचारप्रवाहांचे वर्गीकरण अथवा labeling

संपादन

टॉंग नमूद करतात की, वर्गीकरण करण्याला अथवा labeling करण्याला स्त्रीवादी विचारांमधून विरोध केला जातो तरीदेखील Liberal, Radical, Marxist-Socialist, Existentialist, Postmodernist, Ecological अशी अनेक labels इतिहासामधून पुढे आली. अर्थात स्त्रियांच्या हक्कासाठीचा बौद्धिक व राजकीय लढा अधिक मजबूत करण्यासाठी त्यांचा वापर स्त्रीवादी करतात. कारण स्त्रीवाद ही एकजिनसी विचारसरणी नसून सर्व स्त्रीवादी समान पद्धतीने विचार करत नाहीत. ही स्त्रीवादी labels विभिन्न परिप्रेक्ष्य, दृष्टीकोन व सैद्धांतिक चौकट यांचे आकलन स्त्रियांच्या शोषणाच्या संदर्भात तसेच त्यांचे निराकरण करण्यास मदत करतात; त्यामुळे ती उपयुक्त देखील आहेत. प्रत्येक स्त्रीवादी विचारप्रवाहाची मांडणी, विश्लेषणाच्या संकल्पना व दृष्टीकोन हे परस्परांपेक्षा वेगळे असले तरी स्त्रियांची मुक्ती हे त्यांचे अंतिम उद्दिष्ट असलेले दिसते. या उद्दिष्टपूर्तीच्या प्रक्रियेमधून विवध अशा स्त्रीवादी सिद्धांकनांची निर्मिती झाली. सदर पुस्तकामध्ये पुढीलप्रमाणे अनेक प्रकरणामधून वेगवेगळ्या स्त्रीवादी विचारप्रवाहांचा ऐतिहासिक आढावा घेतला आहे.

उदारमतवादी स्त्रीवाद

संपादन

उदारमतवादी स्त्रीवादाची चर्चा सविस्तर केली आहे. उदारमतवादी स्त्रीवाद हा स्त्रीवादी इतिहासाच्या अगदी प्रारंभी १८ व्या शतकापासून उदयाला आला. अनेक समकालीन स्त्रीवाद हे पारंपारिक उदारमतवादी स्त्रीवादाला प्रतिसाद देत निर्माण झाले. त्यामुळे स्त्रीवादी विचारप्रवाहांची चर्चा करताना उदारमतवादी स्त्रीवादापासूनच सुरुवात करावी लागते. समाजातील ज्या रूढी, परंपरा आहेत त्यामध्ये स्त्रियांच्या दुय्यमत्वाचे मूळ आहे आणि कायद्याच्या चौकटी या स्त्रियांच्या सार्वजनिक जगात प्रवेश करण्याच्या शक्यता संकुचित करतात. कारण स्त्रिया निसर्गतःच शारीरिक तसेच बौद्धिकदृष्ट्या कमकुवत आहेत असे समाज प्रचलित असते याप्रकारे उदारमतवादी स्त्रीवादाचा विचार प्रवाह असलेला दिसतो. बदलत्या काळानुसार त्यामध्ये झालेल्या बदलांचा आढावा या प्रकरणामध्ये घेतला आहे. उदारमतवादी स्त्रीवादावर अनेक टीका देखील झाल्या. जसे की, तो सुरुवातीच्या काळात स्त्रियांच्या सामाजिक भूमिकांबद्दल अतिरिक्त भर आणि पुरुषांच्या विरोधात स्त्रियांच्या प्रश्नाची मांडणी करणारा, वर्गवादी, वर्णवादी, सक्तीच्या भिन्न लैंगिकतेला अप्रत्यक्ष पाठींबा देणारा आहे. पुढील काळामध्ये उदारमतवादी स्त्रीवादामधून वरील मुद्द्यांवर देखील मांडणी झाली.

जहाल स्त्रीवाद

संपादन

उदारमतवादी स्त्रीवादाच्या मांडणीला प्रत्युत्तर देत जहाल स्त्रीवाद पुढे आलेला दिसतो. जहाल स्त्रीवादाची विभागणी radical-libertarian feminists आणि radical-cultural feminists या दोन समूहांमध्ये केलेली असून जहाल स्त्रीवाद या समान प्राथमिक सिद्धांकनाचा पाया असणारे हे दोन स्त्रीवादी विचार प्रवाह हे किती वेगळी आणि बहुआयामी मांडणी करतात हे दाखविले आहे. जहाल स्त्रीवाद मांडतो, की स्त्रियांच्या शोषणाला विषम सत्तासंबंध, वर्चस्व, नियंत्रण, उतरंड आणि स्पर्धा यांनी युक्त अशी पितृसत्ताक सामाजिक संरचना कारणीभूत आहे. त्यामुळे सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक अशा सर्वच पातळ्यांवर संस्थांमध्ये बदल होणे आवश्यक आहे. प्रकरणाच्या शेवटी लेखिका जहाल स्त्रीवादावर टीका करतात, की या सिद्धांकनामधून स्त्रियांबद्दल ज्या समाजप्रचलित ताठर भूमिका आणि गृहीतके मंडळी जातात त्यामध्ये स्त्रियांना नेहमी निष्पाप समजले जाते.

मार्क्सवादी स्त्रीवाद

संपादन

उदारमतवादी आणि जहाल स्त्रीवादांमधील विचारांशी फारकत घेऊन मार्क्सवादी स्त्रीवाद हा स्त्रियांच्या मुक्तीसाठी वर्गमुक्त समाज आवश्यक असल्याचे नमूद करतो कारण सत्ताहिनांनी निर्माण केलेल्या संपत्तीचा उपभोग सत्ताधारी घेतात; ज्यातून मोठ्याप्रमात स्त्रियांचे शोषण होते. लिंगभाव आधारित जी श्रमविभागणी केली जाते त्यानुसार पुरुषांना कामासाठी सार्वजनिक जग उपलब्ध केले जाते तर स्त्रियांना घरकामाच्या माध्यमातून घरादाराच्या 'खाजगी' जगामध्ये अडकवले जाते. जेव्हा स्त्रिया कामाच्या करण्यासाठी येतात तेव्हा त्यांची लैंगिकता, लिंगभाव याला अनुसरून बहुतांशी कामे दिली जातात आणि तुलनेने कमी उत्पन्न दिले जाते. यासोबतच घरकामाची संकल्पना आणि ते सार्वजनिक करण्यासाठी मार्क्सवादी स्त्रीवादी काय विचार मांडतात याची चर्चा केली आहे. यापुढे जाऊन समाजवादी स्त्रीवादाबद्दल सांगितले आहे की, हा स्त्रीवाद मार्क्सवादातील भांडवलशाही विरोधातील मांडणी आणि जहाल स्त्रीवाद्यांची पितृसत्तेविरोधातील या दोन्ही मांडणींचा स्वीकार करून नमूद करतो की, भांडवली पितृसत्ता किंवा पितृसत्ताक भांडवलशाही हे दोन्ही स्त्रियांचे शोषण करतात. त्यामुळे संपूर्ण मुक्ती साध्य करण्यासाठी या सर्व संस्थांविरुद्ध स्त्रियांना लढा द्यावा लागेल. स्त्रियांची लैंगिकता, त्यांच्यावरील सामाजिक बंधने आणि या सगळ्याचा भांडवलशाही सोबत असणारा संबंध अशी आंतरसंबंध प्रस्थापित करणारी मांडणी समाजवादी स्त्रीवादामधून येते.

Psychoanalytic Feminism and Gender Feminism

संपादन

Psychoanalytic आणि Gender Feminism यांची माहिती दिली आहे. Psychoanalytic Feminism नुसार स्त्रियांच्या समाजातील लैंगिक भूमिका या शोषणाच्या मूळाशी आहेत. फ्रॉईडच्या सिद्धांकनाची परंपरा घेऊन हा स्त्रीवाद pre-Oedipal आणि Oedipal themes या संदर्भातून पुढे येतो. तर Gender Feminism नुसार स्त्रीत्वाभोवती समाजामध्ये जी मूल्ये व गृहीतके प्रस्थापित केली गेली आहेत ती कारणीभूत आहेत. Gender Feminism असे मानतो की, मुले आणि मुली जेव्हा पुरुष व स्त्री बनतात तेव्हा ते प्रत्येक लिंगभावाची जी वैशिष्ट्ये समजली जातात त्यानुसार घडवले जातात. टॉंग असे अधोरेखित करतात, की स्त्रियांचे होणारे शोषण अभ्यासताना किंवा विश्लेषण करताना कायदेशीर, राजकीय आणि आर्थिक संस्था आणि संरचना यांची दखल घेणे देखील आवश्यक आहे. केवळ लिंगभावाधारित अस्मिता बघणे हे समस्यात्मक आहे.

अनुभवावादी स्त्रीवाद

संपादन

Existentialist स्त्रीवादाची मांडणी करताना सिमोन दि बोव्ह यांच्या सिद्धांकनाचा पाया त्याला आहे. पुरुष हा स्वतंत्र, स्वतः निर्णय घेणारा, स्वतःच्या अस्तित्वाला अर्थ देणारा असतो तर स्त्रिया या पुरुष नसणाऱ्या अशा 'इतर' मानल्या जातात कारण त्यांनी 'पुरुषांप्रमाणे' असणे ही समाजमान्य नसते. पुढे आधुनिकोत्तर स्त्रीवादाची चर्चा केली असून ते Existentialist स्त्रीवादाची मांडणी डोक्यावर उभी करतात, की स्त्रिया जरी 'इतर' असल्या तरी ते वास्तव परिस्थिती नाकारण्यापेक्षा त्यामाध्यामातूनच स्त्रियांची स्वतंत्र अशी ओळख निर्माण होऊ शकते. त्या स्वतःसाठी स्वतः मागण्या करू शकतील, समाजातील नीतिमूल्ये - नियम - पुरुषी वर्चस्व असणाऱ्या प्रथा परंपरा यांना आव्हान देऊ शकतील. स्त्रियांबद्दल फ्रान्समध्ये निर्माण झालेल्या कल्पना आणि व्याख्या या पुढे जाऊन आधुनिक समजल्या जाऊ लागल्या; ज्याची पुनर्व्याख्या केली गेली. Postmodern feminists नुसार लिखाण प्रत्येक स्त्री स्त्रीवादी बनण्यासाठी प्रयत्न करू शकते. 'चांगली स्त्रीवादी' बनण्यासाठी कोणतेही एक सूत्र नाही.

Multicultural Feminism and Global Feminism

संपादन

Multicultural Feminism आणि Global Feminism याबद्दल सांगताना लेखिका मांडतात की, स्त्रियांच्या स्वत्वाचे जे विखंडन होते ते लैंगिक किंवा शाब्दिक नसून सांस्कृतिक व राष्ट्रीय आहे. वसाहतवादाच्या पार्श्वभूमीवर सदर स्त्रीवादी विचारप्रवाह हा उभा राहिलेला दिसतो. पुस्तकाच्या अखेरच्या प्रकरणामध्ये Eco-Feminism[] बद्दल भाष्य केले असून स्त्रिया आणि निसर्ग यांच्यातील नात्यांची करत टॉंग मांडतात की, या स्त्रीवादी विचारप्रवाहामधून अधिक विस्तृत व सर्वांगीण मांडणी केली जाताना दिसते. त्यांच्यामते व्यक्ती केवळ परस्परांशी जोडलेल्या नसतात तर मानवांपलीकडे जी इतर जग आहे त्यांच्यासोबत देखील आपले नाते असते. मानव ही परस्परांसोबत या मानवाव्यतीरीक्तच्या जगाबद्दल देखील ज्ञान व जबाबदारी बाळगत नाही.

निष्कर्ष

संपादन

सरतेशेवटी आजच्या काळात सर्वच समकालीन स्त्रीवादी विचारप्रवाहांसमोर स्त्रियांमधील भिन्न्त्वाचे, फरकांचे व त्यासोबतच सारखेपणाचे आव्हान आहे. वरील सर्व विचारप्रवाह हे समानपणे चूक किंवा बरोबर नाहीत. परंतु ते महत्त्वाचे नसून प्रत्येकातून जो मुद्दा प्रकर्षाने मांडला जातो ते सिद्धांकन महत्त्वाचे आहे. या पुस्तकाचा प्रमुख हेतू हा स्त्रीवादी क्षेत्रातील काही महत्त्वाचे परिप्रेक्ष्य थोडक्यात मांडणे हा आहे. वरीलपैकी काही महत्त्वाचे तसेच काळाच्या नंतरच्या टप्प्यावर उदयाला आलेल्या स्त्रीवादांचे महत्त्व मांडले आहे कारण स्त्रीवादी सिद्धांकन ही प्रत्येक स्त्रीला तिचे विचार मांडण्याचे स्वातंत्र्य देते व त्यामधून मुक्तीच्या शक्यता निर्माण होतात.

संदर्भसूची

संपादन
  1. ^ "संग्रहित प्रत" (PDF). 2016-03-05 रोजी मूळ पान (PDF) पासून संग्रहित. 2015-12-03 रोजी पाहिले.
  2. ^ टॉंग, रोझमेरी (१९९८) फेमिनिस्ट थॉट : अ मोअर कॉम्प्रिहेन्सिंग इंट्रॉडक्शन, वेस्ट व्ह्यू प्रेस: ऑक्सफोर्ड
  3. ^ https://www.google.co.in/?gfe_rd=cr&ei=GNhfVtLVKueK8QfUoZboDg&gws_rd=ssl#q=rosemarie+tong
  4. ^ https://en.wikipedia.org/wiki/Ecofeminism