फेमिनिस्ट थियरी: लोकल अँड ग्लोबल परस्पेक्टिव्ह (पुस्तक)

हे पुस्तक स्त्रीवादी सिद्धांकनामध्ये महत्त्वाचे पुस्तक समजले जाते आहे. कॅरोल मॅकएनोन आणि सेयुंग-क्युन किम यांनी संपादित केलेल्या व २०१० साली प्रसिद्ध झालेल्या या पुस्तकामध्ये पाश्चात्य जगातील स्त्री चळवळ आणि स्त्रीवादी सिद्धांकनाचा उदय कसा झाला याची सविस्तर मांडणी केली आहे. तत्कालीन स्त्रीयांचे विविध प्रश्न यामाध्यमातून अभ्यासाच्या व राजकरणाच्या क्षेत्रामध्ये पुढे आणले गेले.

प्रस्तावना संपादन

स्त्रीवादी सिद्धांतामध्ये अनेक महत्त्वाच्या संकल्पनांचा समावेश होतो. याचा नव्याने अभ्यास करणा-या संशोधकांसाठी स्त्रीवादी म्हणजे काय इथपासून ते विविध स्त्रीवादी संकल्पनांना समजून घेणे आवश्यक असते. सदर पुस्तक हे वरील हेतू ध्यानात घेऊन लिहिणे आले आहे. स्त्रीवाद या विचारधारेचा उगम, चळवळीशी त्याचा संबंध ते विविध स्त्रीवादी सिद्धांताने कधी व कशी निर्माण झाली या सर्वांचा आढावा घेण्यात आला आहे. फ्रेंच शब्द ‘Female’ (woman) आणि राजकीय संदर्भात वापरला जाणारा शब्द ‘ism’ यांना एकत्रित करून अमेरिकेतील १९७० च्या स्त्री चळवळीने ‘Feminism’ ही संकल्पना पुढे आणली. दुस-या लाटेतील स्त्रीवाद्यांनी जरी ही संकल्पना प्रस्तापित केली तरी स्त्रीवाद म्हणजे नक्की काय याचा अर्थ एतिहासिकदृष्ट्या कधीच स्थिर किंवा स्थगित राहिला नाही. बदलत्या स्थल-काळानुसार स्त्रीवादाचा अर्थ सुद्धा बदलत राहिला; तसेच या संकल्पनेचा गौरव करणारे आणि त्याला प्रश्न विचारणारे या दोघांसाठी ही संकल्पना वादविवादाचा विषय ठरली जाऊ लागली.

स्त्री अभ्यासाचा उदय संपादन

विविध राजकीय परिप्रेक्ष्यांमधून विविध स्त्रीवादांचा उदय झाला आणि त्यातूनच स्त्रीवादी सिद्धांताने निर्माण होऊ लागली. स्त्रीवादी सिद्धातांमधून स्त्रियांचे होणारे शोषण याविषयी ज्ञाननिर्मिती करण्यात आली; ज्या ज्ञानाच्या माध्यमातून स्त्रियांच्या दुय्यमत्वाला प्रतिकार करणे व स्त्रियांचा जीवनमान सुधारणे विषयी strategies विकसित केल्या जाऊ लागल्या. लेखक नमूद करतात, की स्त्रीवादी सिद्धांताने राजकारणा सोबत सतत जोडलेले असणे अतिशय आवश्यक आहे. स्त्रियांच्या जीवनाच्या माध्यमातून स्त्रीवादी सिद्धातांने राजकीय घडामोडींसोबत संबंधित राहणे निकडीचे ठरते. वरील मुद्दे मांडताना प्रस्तावनेमध्ये स्त्रीअभ्यासाच्या सुरुवातीच्या कालखंडाचा एतिहासिक संदर्भ आलेला आहे. स्त्रीवादी सिद्धांतावरून निर्माण करणारे लेखक हे ७० च्या US व कोरिया मधील स्त्री चळवळीमध्ये सहभागी होते. तसेच ८० च्या दशकात त्यांनी स्त्री अभ्यासामध्ये शिक्षण घेतले होते. अभ्यासक्रमांची पुनर्रचना करणे, त्याची आखणी करणे, अभ्यास करणे वाचन साहित्याची निवड करणे अशा प्रकारे स्त्रीवादी सिद्धांतांचे अभ्यासक्रम हे प्रयोगशाळा बनवले होते.

जागतिक आणि स्थानिक यांतील द्वैत संपादन

Global North आणि south मधील स्त्रियांमध्ये alliances निर्माण करणे म्हणजे स्त्रीवाद्यांसाठी महत्त्वाचे ठरू लागले होते. ९० च्या दशकामध्ये जगतीकरणाच्या लाटेमध्ये Global आणि local या दोन्ही संकल्पनेची चिकित्सा केली असून अमृता बसू नमूद करतात त्याचप्रमाणे Global म्हणजे सार्वत्रिक/जागतिक ते पाश्चात स्त्रीवादासोबत जोडलेले असते; तर local म्हणजे विशिष्ट असे जे तिस-या जगासोबत जोडलेले असते. स्त्रीवादी सिद्धातांत देखील जातदेषीय/प्रादेशिक स्त्रीवादी सिद्धांतात व चळवळी म्हणजे local आणि transnational स्थाने आणि discourse यांमधून झालेली निर्मिती म्हणजे Global अशी विभागणी केली जाते Global civil society मध्ये विकसित झालेल्या विभिन्न चळवळी, संस्था, विशिष्ट विषयाला धरून केली जाणारी campaigns यांच्या मधून जागतिक स्त्रीवादांची निर्मिती होते. १९७९ साली झाहीर झालेल्या convention on the Elimination of all forms of Discrimination Against women जाहीरनामा हा transnational स्त्रीवादी संघटना, चळवळी आणि campaigns यांच्या मुळाशी होता. तर वर्ण, वसाहतवाद, वर्ग आणि लिंगभाव यांच्याशी संबंधित बदलत जाणारे सत्तासंबंध हे स्त्रीवादी सिद्धांताच्या शक्यता व मर्यादा यांना आकार देत होते. उदा. जगतीकरणाला नवीन स्वरूपासोबत निर्माण होणारे decimationचे नवीन प्रकार. परंतु हे लक्षात घेणे आवश्यक आहे, कि जगात होणारे आर्थिक, राजकीय, सांस्कृतिक, तांत्रिक आणि भौगोलिक बदल हे संपूर्णपणे शुद्ध अशा स्तानिक अवकाशांची शक्यता नाकारतात. Local तसेच Global काहीच शुद्ध एकजिनसी किंवा अत्यंत विशिष्ट/वेगळे असे नसतात.

स्त्रीवादी सिद्धांकान आणि स्त्रीयांचे अनुभव संपादन

या पुस्तकामध्ये असलेले विविध लेख हे स्त्रीवादी सिद्धांतामधून स्त्रियांच्या मुक्तीच्या शक्यता व्यक्त करतात. विभिन्न सामाजिक स्थानांमधून येणा-या स्त्रियांच्या गटांनी एकमेकांसोबत जोड घेणे कसे महत्त्वाचे आहे, त्या negotiationचे models काय असू शकतात याबद्दल मांडणी केली आहे. स्त्रिया–स्त्रियांमधील विभिन्नता लक्षात घेतानाच जागतिकीकरणाची आर्थिक व सांस्कृतिक प्रतिक्रिया, अरब आणि मुस्लिम स्त्रीवादांची नव्याने पुढे येणारी मांडणी यांची सुद्धा दाखल घेतली आहे. २० व्या ते २१ व्या शतकापर्यंत वेगवेगळ्या सामाजिक एतिहासिक स्थानांमध्ये असणा-या स्त्रियांचे पद्धतशीरपणे होणारे शोषण हा कळीचा मुद्दा आहे. परंतु स्त्रिया ह्या विविध सामाजिक, राजकीय, आर्थिक व सांस्कृतिक पार्श्वभूमीमधून येत असल्याने त्यांचे शोषणाचे अनुभव सारखे नसतात तसेच त्याला प्रतिकार करणारे स्त्रीवादी सिद्धांत सुद्धा एकच प्रकारचे असू शकत नाही. म्हणूनच यापुस्तकामध्ये विशिष्ट संदर्भानुसार विभिन्न विभिन्न स्त्रीवादी सिद्धांताने मांडण्यात आले आहे. कारण ‘स्त्रीवाद हा शब्द देखील जगात सर्वत्र सारख्या पद्धतीने वापरल्या जात नाही. तसेच लिंगभाव संकल्पनेची चिकित्सा करताना वर्ण ethnicity, वर्ग राष्ट्रीयत्व लैंगिकता यांच्यासोबत असणारे आंतरसंबंध स्त्रियांचे स्थान तसेच अस्मिता कशी निर्माण करतात हे बघणे गरजेचे असते. स्त्रियांमधील सामाजिक आणि प्रादेशिक भिन्न्तेची दखल घेत Global व Local यांच्या दुवैताला प्रश्नांकित करण्याचा प्रयत्न केला आहे. गो-या मध्यम वर्गीय भिन्नलिंगी अमेरिकन स्त्रीवाध्यांशी सिद्धांताने ही sexismचे local, particular अनुभव हे सार्वत्रिकपणे सर्व स्त्रियांना लागू होतात अशी मांडणी करतात. याला विरोध करीत वरील स्त्रीवाद हा खरतर local lamiae 87 theory कसा आहे हे सांगून या स्त्रीवाद्यांनी वर्ग, वर्ण, राष्ट्र आणि लैंगिकता यांच्या जोरावर स्त्रीवादी सिद्धांतावर कसे नियंत्रण/declination प्राप्त केले आहे हे मांडले आहे. सदर पुस्तकामध्ये स्त्रीवादी सिद्धांतानाशी वरील सर्व संदर्भात केलेली मांडणी ही पुढील ३ विभागांमध्ये मांडलेली आहे प्रत्येक विभागाला प्रस्तावना असणे त्यामध्ये असणा-या लेखांचे स्वरूप, त्यांचा ऐतिहासिक संदर्भ यांचा समावेश केलेला आहे.

Groundings and movements संपादन

विभाग पहिला groundings and movements यामध्ये लिंगभाव, स्त्रियांचे अनुभव, जे जे खाजगी ते राजकीय, भिन्नता आणि आंतरछेदिता या पाच महत्त्व्ताच्या संकल्पनाच्या ऐतिहासिक आढावा घेऊन त्यांची सविस्तर चर्चा केली आहे. २० व्या शतकाच्या शेवटी आणि २१ व्या शतकाच्या प्रारंभीच्या स्त्रीवादी मांडणीमधून या संकल्पना पुढे आल्या ज्यांच्या वर आधारित अश्या विविध लिंगभावाधारित शोशाणाविरुद्ध/भेदभाव विरुद्ध निर्माण केल्या गेल्या. कोणत्याही स्त्रीवादी सिद्धांतामध्ये या पाच संकल्पना प्राथमिक आहे. Movement या उपविभागामध्ये मध्ये local vs. आणि global woman’s movement यांची ऐतिहासिक पार्श्वभूमी येते. ज्या राष्टीय सीमारेषांच्या पलीकडे जाणारे स्त्रीवादी राजकारण, पुन्रुत्पादनाचे व लैगिंक हक्क, लिंगभावात्मक ओळख, वर्ण व अर्थकारणाचे प्रश्न आणि eco & animism हे सर्व महत्त्वाचे मुद्दे संकलित केले आहेत. कारण स्त्रीवादी हे स्त्रीवादी चळवळी नेहमीच एक महत्त्वाचा resource राहिला आहे.

Theorizing intersecting identities संपादन

विभाग दोन theorizing intersecting identities यामध्ये subsection असून पहिला उपविभागामध्ये स्त्रिया तसेच पुरुषांमधील भिन्नात्वाचे प्रश्न अधोरेखीत केले आहेत . परस्पर संबंधित वर्चस्ववादी या स्त्री वा पुरुषांची अस्मिता व परिस्थिती कशी निर्माण करण्यात कारणीभूत ठरतात हे विभिन्न स्त्रीवादी सिद्धांतामधून मांडले आहे. शोषणाचे जे वेगवेगळे प्रकार आहेत. त्यासोबत लिंगभावाच्या राजकारणाचे असणारे आंतरसंबध हे स्त्रीवादी सिद्धतानाणी प्रयत्न पूर्व मांडलेत.Boundries and belonging या subsection मध्ये स्वताच्या अस्मितेबद्दल असणारे कथन, समूहासोबतचे जोडले पण तसेच समूह/अस्मिता यांच्या सीमारेषा पार करण्यात येणारी आव्हाने यांचे स्पष्टीकरण देणारे लेख आहेत. असेच जगतीकरणाच्या काळामध्ये flume 78 activism मधील con & lists आणि cotters कसे समजून घ्यायचे याचे मार्गदर्शन नवीन संशोधकासाठी केलेले आहे.

Theorizing feminist knowledge, Agency and politics संपादन

विभाग तीन theorizing feminist knowledge, Agency and politics यामध्ये स्त्रीवादी भूमिदृष्टी सिद्धांत आणि discourse power performativity यांची उत्तर संरचनावादी चिकित्सा यांसाठी स्त्रीवादी राजकारण निर्माण करण्याची गरज तसेच त्यासाठी आवश्यक स्त्रीवादी सिंधान्ताने माडण्यात आली आहेत. विभाग दोन मध्ये जे प्रश्न उभे करण्यात आले त्यांची उत्तरे देण्याचा प्रयत्न विभाग तीन मध्ये केला आहे . परिवर्तनासाठी स्त्रीवादी राजकरणामधून प्रयत्न होणे गरजेचे असतात. सामाजिक वस्तवावर आधारित विशिष्ट स्त्रीवादी परीपेक्ष निर्माण होणे त्यासाठी आवश्यक असते हे भूमीदृष्टी सिद्धांतामधून नमूद केले आहे. उत्तर-संरचनावादी सिद्धांतामधील महत्त्वाच्या संकल्पना, language-subjectivity-liscourse-power यांतील आंतरसंबंध, स्त्रिया-लिंग-लिंगभाव-अनुभव या मुलभूत संकल्पनांची चर्चा या विभागामध्ये केली आहे. पुस्तकाच्या शेवटी काही लेख आहेत ज्यांच्या मांडणीमधून उत्तर-संरचनावाद आणि भूमीदृष्टी सिद्धांत यांच्या पलीकडे जाण्याची गरज तसेच सिद्धांतामधून येणा-या कमतरता भरून काढण्याचे उपाय यांची चर्चा केली आहे. स्त्रियांचे जीवन पुन्हा स्थानांकित करणे आणि त्यांचे दैनंदिन जीवनातील अनुभव हे स्त्रीवादी सिद्धांताच्या केंद्रस्थानी असून स्त्रिया हा सामाजिक समूह अस्थिर आणि स्त्रीवादी राजकारणाच्या कर्त्या असतात हे अधोरेखित केले आहे.

महत्त्वाच्या संकल्पना संपादन

स्त्रीवाद, स्त्री चळवळ, वसाहतवाद, ग्लोबल नॉर्थ, ग्लोबल साऊथ

प्रतिसाद संपादन

Xiumei Pu यांनी सदर पुस्तकावर पुढील प्रतिक्रिया दिली आहे की, या पुस्तकाचे संपादन करणाऱ्या लेखकांनी पाश्चात्य वर्चस्ववादी स्त्रीवादाला स्थानिक व जागतिक दृष्टीकोनातून प्रश्नांकीत केले आहे. ‘स्थानिक’ ही संकल्पना त्यांनी ‘एतद्देशीय व प्रादेशिक’ सिद्धांकान आणि स्त्रीवाद; जे कोणत्याही प्रदेशामध्ये निर्माण झालेले असोत यांच्यासाठी वापरली आहे. गोऱ्यां मध्यमवर्गीय भिन्नलिंगी अशा उत्तरेकडील स्त्रियांना स्थानिक स्त्रीवादाचा एक वेगळा असा आविष्कार म्हणाले असून त्यांचे सार्वत्रिक असणे नाकारले आहे.

संदर्भ सूची संपादन

https://books.google.co.in/books/about/Feminist_Theory_Reader.html?id=ZI7Wbg1awOsC&redir_esc=y