फॅरनहाइट
फॅरनहाइट हे तापमान मोजण्याचे एक एकक आहे. डॅनियल फॅरनहाइट ह्या जर्मन शास्त्रज्ञाने १७२४ साली ह्या एककाचा शोध लावला. ह्या मोजमापानुसार ३२ फॅरनहाइटला पाणी गोठते व २१२ फॅरनहाइटला पाणी उकळते.
सध्या जगातील बहुतांशी देशांनी फॅरनहाइटचा वापर थांबवून सेल्सियस ह्या एककाचा स्वीकार केला आहे. अमेरिकेमध्ये मात्र अजुनही फॅरनहाइट हेच एकक वापरले जाते.
फॅरनहाइट व सेल्सियस
संपादन- [°से] = ([°फॅ] − ३२) × ५⁄९
- [°फॅ] = [°से] × ९⁄५ + ३२