फाळणी वेदना स्मृतिदिन
फाळणी वेदना स्मृतिदिन हा दिवस भारताच्या संदर्भात विशेष दिवस म्हणून घोषित झाला आहे.याच दिवसाला विभाजन विभीषिका स्मृति दिवस असेही ओळखले जाईल. १४ ऑगस्ट हा दिवस त्यासाठी निश्चित करण्यात आला आहे.[१]
पार्श्भूमी
संपादनभारतावरील ब्रिटिश राजसत्ते अंमल दूर करून भारताला स्वातंत्र्य प्राप्त करून देण्यासाठी भारतीय क्रांतिकारकांनी प्रतिकार केला. त्यांच्या प्रयत्नांना यश मिळून अखेर १४ ऑगस्टच्या मध्यरात्री १२ वाजता म्हणजे १५ ऑगस्ट रोजी भारताला स्वातंत्र्य मिळाले. याचवेळी अखंड भारताची फाळणी होऊन पाकिस्तान हा नवा देश उदयाला आला. अखंड भारताचे नागरिक असलेले भारतीय या फाळणीमुळे नव्याने उदयाला आलेल्या पाकिस्तानचे नागरिक झाले. ही फाळणी होत असताना झालेल्या राजकीय आणि ऐतिहासिक घटना देशाच्या नागरिकांच्या आयुष्यात उलथापालथ करणाऱ्या ठरल्या. यात अनेक कुटुंबे बेघर झाली. दोन लाखापेक्षा अधिक नागरिकांनी प्राण गमावले. सुमारे दीड कोटी नागरिक हे विस्थापित झाले होते.[२] या वेदनेची स्मृती म्हणून १४ ऑगस्ट रोजी फाळणी वेदना स्मृतिदिन म्हणून भारताचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी यांनी घोषित केला.[३]
हेतू
संपादनसदर दिवस हा अन्याय , द्वेष इत्यादी नकारात्मक भावना वाढीला लावणारा नसून एक ता, सद्भावना, आदर या मूल्यांची जोपासना करणारा असावा असा हेतू यामागे आहे.[४]
संदर्भ
संपादन- ^ "१४ ऑगस्ट आता 'हा' दिवस म्हणून ओळखला जाणार; नरेंद्र मोदींनी केली घोषणा". Loksatta. 2021-08-14. 2021-08-14 रोजी पाहिले.
- ^ प्रधान, बागवान , देशपांडे, संतोष, आसिफ,हृषीकेश (२०२१). "पाऊणशेच्या पाऊलखुणा". पुणे: लोकसत्ता. pp. ७.CS1 maint: multiple names: authors list (link)
- ^ "फाळणी वेदना स्मृतिदिन - बातम्या |" (इंग्रजी भाषेत). 2021-08-14 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2021-08-14 रोजी पाहिले.
- ^ "नरेंद्र मोदींनी केली घोषणा; १४ ऑगस्ट साजरा होणार …. दिन". maharashtratoday. २०२१-०८-१४.[permanent dead link]