फायनान्शियल टेक्नोलॉजी (इंडिया) लिमिटेड

फायनान्शियल टेक्नोलॉजी (इंडिया) लिमिटेड (एफटीआयएल) (ज्याला आता ६३ मून तंत्रज्ञान मर्यादित म्हणून ओळखले जाते) ही एक भारतीय वित्तीय सेवा कंपनी आहे.[१] तंत्रज्ञान बौद्धिक मालमत्ता तयार करण्याचे आणि आर्थिक बाजारात व्यापार करण्याचे काम ही कंपनी करते. ही एक आयएसओ २७००१-२००५ आणि ९००१:२००० प्रमाणित कंपनी आहे.[२][३] जे पुढच्या पिढीच्या आर्थिक बाजारात देवाणघेवाण करण्याकरिता वापरले जाणारे तंत्रज्ञान (बौ.मा.) आणि डोमेन कौशल्य प्रदान करते.कंपनीने ऑफर केलेल्या सोल्यूशन्समध्ये एक्सचेंज सोल्यूशन्स, ब्रोकरज सोल्यूशन्स, मेसेजिंग सोल्युशन्स आणि टेक्नॉलॉजी अँड प्रोसेस कन्सल्टिंग यांचा समावेश आहे.[२]

फायनान्शियल टेक्नोलॉजी (इंडिया) लिमिटेड
प्रकार खाजगी कंपनी
उद्योग क्षेत्र संगणक सेवा (बँकिंग आणि फायनान्स)
स्थापना १९८८
संस्थापक जिगनेश शाह
मुख्यालय चेन्नई, भारत
महत्त्वाच्या व्यक्ती

एस.राजेेंद्र,व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी आणि व्यंकट चेरी कंपनी प्रमुख

उत्पादन=सॉंफ्टवेयर
महसूली उत्पन्न

आयएनआर रुंपातरित ३८ दशलक्ष (२०१६ प्रमाणे)

देवाणघेवाण=(बीएसई /एफआयएनटिईसीएच) (एनएसई/एफआयएनएएनटिईसीएच
कर्मचारी आतापर्यंत ८५७ (२०१६ प्रमाणे)
संकेतस्थळ https://www.63moons.com/

इतिहास संपादन

फायनान्शियल टेक्नोलॉजी ग्रुपची प्रमुख कंपनी फायनान्शियल टेक्नोलॉजी (इंडिया) (एफटीआयएल) ने १९८८ मध्ये आपले कामकाज सुरू केले.[२] १९९५ मध्ये त्याचे पहिले बौद्धिक मालमत्ता कार्यालय होते. २०१५ मध्ये कंपनीने आपले नाव 'फायनान्शियल टेक्नोलॉजी'(इंडिया) लिमीटेड हे बदलवुन ६३ मून तंत्रज्ञान मर्यादित असे केले.[४] जिगनेश शाह हे फायनान्शियल टेक्नोलॉजी (इंडिया) लि.चे संस्थापक आणि अध्यक्ष एमेरिटस आहेत.[५] यापूर्वी त्याने बॉम्बे स्टॉक एक्सचेंज (बीएसई) येथे काम केले असुन ते मल्टी कमोडिटी एक्सचेंज ऑफ इंडिया लिमटेडचे संस्थापक आहेत.[६] (एमसाएक्स), जगातील आठव्या क्रमांकाच्या कमोडिटी फ्यूचर्स (व्यापारी माल) यांची देवाणघेवाण होते.[७]

अनू तंत्रज्ञान संपादन

  • एटीओएम (Atom) टेक्नॉलॉजीज लिमिटेड ही एक पेमेंट सर्व्हिसेस व्यवसाय संस्था आहे जी ६३मून्स टेक्नॉलॉजीज अंतर्गत कार्यरत आहे.[८]
  • टिकर प्लांट हा एक विश्लेषक व्यासपीठ आहे ज्यातवस्तु, परदेशी चलन आणि अनिश्चित स्वरूपाचे व्याज मिळणारे शेयर्स आणि रोखे यांचे देशांतर्गत आणि आंरराष्ट्रीय आर्थिक देवाणघेवाण होते तसेच ओटीएस मार्केटवरील बाजारातील माहिती वास्ताविक वेळेच्या स्वरूपात मिळते.[९][१०]

सध्या, एफटीआयएलने आपल्या सर्व देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय प्रयत्नांचा अभ्यास केला आहे.[११]

सीएसआर उपक्रम संपादन

महिला सक्षमीकरण,[१२] पर्यावरणीय टिकाव यासारख्या क्षेत्रात परोपकार कामात एफटीआयएल सक्रियपणे सहभागी आहे. कर्मचारी गुंतवणूकीचे क्रियाकलाप, शिक्षण, आरोग्य आणि सामाजिक कल्याण आणि रोजगार कौशल्य यासारख्या उपक्रमात सक्रिय सहभाग घेते.[१३]

पुरस्कार संपादन

कंपनीने अनेक पुरस्कार जिंकले आहेत. त्यात ॲंमिटी कॉपोरेट एक्सलन्स अवॉर्ड, आयटी पीपल अवॉर्ड फॉर प्रॉडक्ट इनोव्हेशन यांचा समावेश आहे,[१४] एक्सचेंज आणि ब्रोकरेज उत्पादने. यंग एंटरप्रेन्योर ऑफ द इयर २००६ ऑफ बिझिनेस ट्रान्सफॉर्मेषन,[१५] आयएस सर्व्हिसेस इन सिक्युरिटी इन डीएससू आय एक्सलन्स अवॉर्ड २०११ एसएमई श्रेणी आणि २०११ सालचा गोल्डन पीकॉक एचआर एक्सलन्स ॲंवॉर्ड.[१६] फिनटेक १०० रॅंकिंग्ज २०११ मध्येही कंपनीची वैशिष्ट्यीकृत आहे.[१४]

संदर्भ संपादन

  1. ^ "Financial Technologies changes name to 63 Moons".
  2. ^ a b c "63 MOONS TECHNOLOGIES LTD. (63MOONS) - COMPANY HISTORY".
  3. ^ "63 MOONS TECHNOLOGIES LTD. (63MOONS) - COMPANY INFORMATION".
  4. ^ "63 Moons Technologies".
  5. ^ "NCLT bars Jignesh Shah, nine others from being directors in companies".
  6. ^ "The fall of Jignesh Shah". Archived from the original on 2019-08-08. 2019-09-11 रोजी पाहिले.
  7. ^ "NSEL crisis: FTIL's Jignesh Shah arrested for alleged role in Rs 5,600-crore scam".
  8. ^ "Japan's NTT Data buys 55% stake in Atom Tech for $9 million".
  9. ^ "Ace ties up with TickerPlant; Market Data will be available on real time basis".
  10. ^ "The great enabler - Jignesh Shah".
  11. ^ "Jignesh Shah Resigns as FTIL MD, to Become Chairman Emeritus".
  12. ^ "Financial Technologies India Limited". Archived from the original on 2019-08-09. 2019-09-11 रोजी पाहिले.
  13. ^ "63 Moons Technologies Ltd".
  14. ^ a b "63 Moons Technologies Ltd".
  15. ^ "EOY 2006 Winners". Archived from the original on 2019-08-09. 2019-09-11 रोजी पाहिले.
  16. ^ "Financial Tech wins 'Golden Peacock HR Excellence Award' 2011".