फराहबक्ष महाल

(फराहबाग या पानावरून पुनर्निर्देशित)

फराहबक्ष महाल हा महाराष्ट्रातील अहमदनगर येथे असलेला महाल आहे. चौरसाकृती तलावाच्या मध्यभागी ही अष्टकोनी वास्तू आहे. अहमदनगरच्या निजामशाहीतील राजा मुर्तझा निजामशाह याने या महालाचे बांधकाम इ.स. १५७६ ते इ.स. १५८३ या काळात करवून घेतले. घुमट, उंच कमानी व मोठी गवाक्षे असलेल्या महालाच्या मध्यभागी रंगमहाल आहे. मध्यभागी तसेच चारही बाजूला कारंजी असून त्यासाठी त्याकाळी खापरी नळाने पाणी आणण्यात आले होते.

फराहबक्ष महाल, अहमदनगर

राष्ट्रीय संरक्षित स्मारक

संपादन

भारत सरकारने फराहबक्ष महालाला दिनांक ४ मार्च, इ.स. १९०९ रोजी महाराष्ट्रातील राष्ट्रीय संरक्षित स्मारक म्हणून घोषित केलेले आहे.[]

संदर्भ आणि नोंदी

संपादन
  1. ^ "नोटीफिकेशन ऑफ सेंट्रली प्रोटेक्टेड मॉन्यूमेन्ट्स इन इंडिया" (PDF) (इंग्रजी भाषेत). 2016-03-04 रोजी मूळ पान (PDF) पासून संग्रहित. ५ ऑगस्ट, इ.स. २०१३ रोजी पाहिले. |ॲक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)