फतेखान हा विजापूरच्या आदिलशाहीतील सरदार होता.

इ.स. १६४८ मध्ये अदिलशहाने त्याला छत्रपती शिवाजी महाराजांवर चालून जाण्याचा हुकूम दिला होता. त्यानुसार फतेखानाने पुरंदराजवळील बेलसर या गावी छावणी टाकली होती. शिवाजी महाराजांनी बाजी पासलकर यांना सांगून फतेखानाच्या छावणीवर हल्ला करविला. त्यामुळे फतेखानाने चिडून पुरंदरावर हल्ला केला. पुरंदरावर झालेल्या लढाईत त्याचा पराभव झाला व त्यास विजापुरास पळ काढावा लागला.