प्लेनो अमेरिकेच्या टेक्सास राज्यातील शहर आहे. हे शहर डॅलस-फोर्ट वर्थ महानगराचा भाग आहे. कॉलिन काउंटीतील या शहराची लोकसंख्या २०१० च्या जनगणनेनुसार २,६९,७७६ होती.

१८९१मधील प्लेनोचा नकाशा

येथे अलायन्स डेटा, सिनेमार्क थियेटर्स, डेल सर्व्हिसेस, डॉक्टर पेपर स्नॅपल ग्रूप, एरिक्सन, फ्रिटो-ले, एच.पी. एंटरप्राइझ सर्व्हिसेस, हुआवेई, जे.सी. पेनी, पिझा हट, रेंट-ए-सेंटर, सीमेन्स पीएलएम सॉफ्टवेर सारख्या अनेक मोठ्या कंपन्यांची मुख्यालये आहेत.