प्रश्वा (Procyon) हा लघुलुब्धक (Canis Minor) या तारकासमूहातील सर्वांत तेजस्वी (आल्फा) तारा आहे. हा आकाशातील आठ क्रमांकाचा तेजस्वी तारा असून त्याची दीप्ती (द्युति) सूर्याच्या सातपट आहे. जानेवारी ते मे या काळात हा आकाशगंगेच्या कडेशी दिसतो

लघुलुब्धक तारकासमूहातील बीटा ताऱ्याचे नाव जोमेइसा (Gomeisa) असे आहे.

पुरातन काळापासून प्रश्वा माहीत असून त्याचे उल्लेख प्राचीन साहित्यात सापडतात. बॅबिलोनियन व इजिप्शियन लोक प्रश्वा व व्याध यांची पूजा करत.

आर्द्रा (बीटलजूस), व्याध व प्रश्वा यांचा आकाशात दिसणारा मोठा समभुज त्रिकोण पूर्वीपासून नाविकांना मार्गदर्शक झालेला आहे. प्रश्वा हा तारा मार्चच्या सुरुवातीस खगोलाचे ध्रुवबिंदू व निरीक्षकाचे खस्वस्तिक यांतून जाणाऱ्या खगोलावरील वर्तुळावर येतो. व्याधाला ‘डॉग स्टार’ म्हणतात व प्रश्वा व्याधाच्या आधी उगवतो म्हणून ‘कुत्र्याकडे जाणारा’ या अर्थाच्या ग्रीक शब्दावरून याचे प्रॉसियान हे नाव पडले आहे.


पहा: चांदण्यांची नावे|