प्रमाणक हा व्यवसायातील व्यवहाराला पुराव्याचा आधार देणारा दस्तऐवज होय. एखाद्या व्यवहाराची निश्चिती होताच त्याचे प्रमाणक केले जाते. उदा. विक्री होताच विक्री प्रमाणक, रोख रक्कम काढताना रोख प्रमाणक बनवले जाते. प्रमाणकावर व्यवहाराचे स्वरूप, व्यवहार करणाऱ्या व्यक्ती किंवा लेखा, तारीख, रक्कम, मालाचे तपशील, व्यवहार करणाऱ्या व्यक्ती किंवा अधिकाऱ्यांच्या सह्या असे तपशील नोंदवण्याची सोय असते.

प्रमाणकांचे प्रकारसंपादन करा

१) अंतर्गत प्रमाणक ( इंग्लिश : Internal Voucher) - व्यवसायातील अंतर्गत व्यवहारांच्या नोंदीसाठी वापरले जाणारे प्रमाणक म्हणजे अंतर्गत प्रमाणक होय. दोन खात्यांमधील देव घेव, हात खर्चासाठी घेतली जाणारी रोख रक्कम, गोदामातून काढलेल्या मालाची नोंद ज्या कागदपत्रावर केली जाते ते सर्व अंतर्गत प्रमाणक आहेत. मोठ्या व्यवसायातील व्याप, अनेक शाखा, कामाच्या विविध पाळ्या, कर्मचाऱ्यांची संख्या इत्यादी घटकांमुळे अंतर्गत व्यवहारांची नोंद ठेवणे आवश्यक बनले आहे.अंतर्गत प्रमाणकावर सह्या करणारे सर्व जण व्यवसायाचे नोकर असतात.

२) बाह्य प्रमाणक ( इंग्लिश : External Voucher) - व्यवसायाबाहेरील व्यक्ती किंवा इतर व्यवसायाबरोबर झालेल्या व्यवहारांची नोंद ठेवण्यासाठी वापरल्या जाणारया प्रमाणकास बाह्य प्रमाणक असे म्हटले जाते. बाह्य प्रमाणक हा व्यवसायाला इतर संस्थे कडून प्राप्त होतो. थोडक्यात इतर व्यापारी संस्थेने हा प्रमाणक जारी केलेला असतो. मालाची उधारीवर खरेदी केल्याचे प्रमाणक, कर चलान, रोख खरेदी प्रमाणक इत्यादी.

फायदेसंपादन करा

१) कर निर्धारण करताना नफ्याची गणना करण्यासाठी पुरावा म्हणून प्रमाणक उपयोगी असतात .

२) व्यवहारांचा विश्वसनीय पुरावा. - वाद उद्भवल्यास प्रमाणकावरील माहिती पुरावा म्हणून उपयोगी पडते.

३) अन्केक्षकाला त्याची जबाबदारी कुठल्याही व्यक्तिगत ढवळाढवळीशिवाय पार पाडता यावी म्हणून.

४) एखाद्या व्यवहाराची तारीख, रक्कम, व्यक्तीची खात्री पटवून घेता यावी म्हणून.

५) न्यायालयात पुरावा म्हणून व्यवसायातील प्रमाणके सादर करता येतात.