प्रफुल्ल शिलेदार
प्रफुल्ल शिलेदार (जन्म नागपूर ३० जून १९६२) हे मराठीतील कवी आणि अनुवादक आहेत. त्यांचे मराठीत चार कविता संग्रह, सहा अनुवादित पुस्तके, सहा संपादित ग्रंथ प्रकाशित आहेत. त्यांच्या कवितांचे इंग्रजी, हिंदी, मल्याळम, मणिपुरी, नेपाळी, कन्नड़, गुजराती, पंजाबी, तेलुगु, ओडिया, दखनी, स्लोवाक, टर्किश, जर्मन इत्यादी भाषांमध्ये अनुवाद झाले असून हिंदी, इंग्रजी, कन्नड आणि ओडिया भाषांमध्ये त्यांच्या कविता संग्रहरुपात प्रकाशित झाल्या आहेत.
प्रफुल्ल शिलेदार | |
---|---|
![]() प्रफुल्ल शिलेदार | |
जन्म नाव | प्रफुल्ल दत्तात्रय शिलेदार |
जन्म |
३० जून १९६२ नागपुर |
राष्ट्रीयत्व | भारत |
कार्यक्षेत्र | साहित्य,अनुवाद व संपादन |
भाषा | मराठी |
साहित्य प्रकार | कविता, कथा, समीक्षा, अनुवाद, संस्मरणे, ललित |
कार्यकाळ | १९८० पासून |
प्रसिद्ध साहित्यकृती | पायी चालणार (कवितासंग्रह - २०१७) |
प्रभाव | समकालीन भारतीय आणि विश्व साहित्य यांचा प्रभाव |
वडील | दत्तात्रय शिलेदार |
आई | वसुधा शिलेदार |
पत्नी | साधना शिलेदार |
अपत्ये | दोन मुली |
पुरस्कार | कवीवर्य केशवसुत काव्य पुरस्कार, महाराष्ट्र शासन, २००६ आणि साहित्य अकादमी अनुवाद पुरस्कार, नवी दिल्ली- २०१८ |
अनेक महत्वाच्या राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय संकलनात त्यांच्या कविता समाविष्ट आहेत. ते भारतातील तसेच युरोप, अमेरिका, मध्यपूर्वेतील देशातील साहित्यिक आयोजनात सहभागी झाले आहेत.
कवितेकरता त्यांना केशवसुत पुरस्कार, शरच्चंद्र मुक्तिबोध पुरस्कार, कवी कुसुमाग्रज पुरस्कार, बाराशिव पुरस्कार, पद्मश्री विखे पाटील पुरस्कार इत्यादी सन्मान लाभले आहेत तर अनुवादाकरता साहित्य अकादेमी पुरस्कार, बाळशास्त्री जांभेकर पुरस्कार, गांधी स्मारक निधी पुरस्कार मिळाले आहेत.
‘युगवाणी’ या वाङमयीन नियतकालिकाचे ते २०१८ पासून संपादक आहेत. आर्ट ओमाय, न्यू यॉर्क या प्रतिष्ठित संस्थेची आंतरराष्ट्रीय लेखक निवासवृत्तीअंतर्गत त्यांनी काही काळ अमेरिकेत वास्तव्य केले.
प्रफुल्ल शिलेदारांची साहित्यिक कारकीर्द
संपादनप्रकाशित कविता संग्रह (मराठी)
संपादन१. ‘स्वगत’ (१९९३)
२. ‘जगण्याच्या पसाऱ्यात’ (पॉप्युलर प्रकाशन, मुंबई - २००६)
३. पायी चालणार (पॉप्युलर प्रकाशन, मुंबई - २०१७, २०२१, २०२४)[१]
४. हरवलेल्या वस्तूचं मिथक (पॉप्युलर प्रकाशन, मुंबई - २०२३)
इतर भाषेत प्रकाशित कविता संग्रह आणि स्फुट भाषांतरे
संपादन१. पैदल चलूँगा (हिंदी - साहित्य भांडार, इलाहाबाद, २०१७)
२. समुद्र पर दस्तक (हिंदी -सेतू प्रकाशन, दिल्ली, - २०२३)
३. आत्मकथे बरेयुवा मुन्ना ( कन्नड – २०२३)
४. Scratching the Silence (English – Red River, Delhi - 2025)
५. समुद्ररे कराघात (ओडिया – धौली बुक्स, भुवनेश्वर - २०२५)
६. इंग्रजी, हिंदी, मल्याळम, मणिपुरी, ओडिया, नेपाळी, कन्नड, गुजराती, पंजाबी, दखनी, तेलुगु, स्लोवाक, जर्मन, टर्किश इत्यादी भाषांमध्ये कवितांची भाषांतरे प्रकाशित झाली.
(इंग्रजी कविता) [२]
(हिंदी कविता) [३]
हिंदीत अनुवादित झालेल्या आणखी काही कविता [४]
प्रफुल्ल शिलेदार यांनी अनुवादित केलेले साहित्य
संपादन- ‘पूल नसलेली नदी’ (मानसी यांच्या मल्याळम कथांचे अनुवाद – मनोविकास प्रकाशन, पुणे -२००९, विजय प्रकाशन, नागपूर - २०२४) या अनुवादित पुस्तकाबाबत आनंदाचे पान या टिव्ही कार्यक्रमात मुलाखत [५]
- ‘जास्तीचे नाही’ (विनोद कुमार शुक्ल यांच्या हिंदी कवितासंग्रहाचा अनुवाद – पॉप्युलर प्रकाशन, मुंबई -२०१३)
- ‘संशयात्मा’ (ज्ञानेंद्रपती यांच्या हिंदी कवितासंग्रहाचा अनुवाद – साहित्य अकादेमी, २०१३ ) [६]
- ‘दगड भिरकावू लागलोय’ (चंद्रकांत देवताले यांच्या हिंदी कवितासंग्रहाचा अनुवाद – साहित्य अकादेमी, २०१९)
- ‘केवळ काही वाक्यं’ (उदयन वाजपेयी यांच्या हिंदी कवितासंग्रहाचा अनुवाद- वर्णमुद्रा, शेगाव, २०२३)
- ‘दुसरा ना कोणी’ (कुंवर नारायण यांच्या हिंदी कवितासंग्रहाचा अनुवाद – साहित्य अकादेमी, मुंबई -२०२५)
- अनेक देशी विदेशी कवींच्या कवितांचे अनुवाद विविध नियतकालिकांमधून प्रकाशित
संपादने
संपादन१. ‘आदिवासी साहित्य आणि अस्मितावेध’, लोकवाङ्मय गृह, मुंबई, (भुजंग मेश्राम यांच्या वैचारिक लेखनाचे संपादन- लोकवाङमय गृह, मुंबई - २०१४, २०२३)
२. अरुण कोलटकर, मॅजेस्टिक प्रकाशन, मुंबई (समीक्षा संपादन-२०२४),
३. सत्य, सत्ता आणि साहित्य, पपायरस, कल्याण, (जयंत पवार यांच्या वैचारिक आणि अन्य लेखनाचे सहसंपादन – २०२४)
४. सांध्य सूक्ते (२००४), शुभवर्तमान (२०१७) (ना. वा. गोखले यांच्या निवडक कवितांचे संपादन)
५. ‘युगवाणी’ या विदर्भ साहित्य संघ, नागपूर यांच्या वाङमयीन नियतकालिकाचे संपादन (एप्रिल २०१८ पासून आजपर्यंत. या काळात अनेक विशेषांकांचे संपादन)
(‘युगवाणी’च्या संपादनाबाबत मैत्रेयी भट्टाचारजी चौधरी यांनी घेतलेली मुलाखत )[७]
गद्य
संपादन१. येरझारा, पपायरस प्रकाशन, मुंबई (इतर गद्य, अनुवाद आणि स्फुट लेखन) (२०२५)
इतर लेखन
संपादनसमीक्षा, कथा, स्तंभ लेखन, पुस्तक परीक्षणे, संस्मरणे इत्यादी स्फुट लेखन.
संकलनांमध्ये समावेश
संपादन१. दृष्यांतर (मराठी), नॅशनल बुक ट्रस्ट ( संपादन: चंद्रकांत पाटील – २००७ )
२. मराठी पोएट्री १९७५ – २००० (इंग्रजी); साहित्य अकादेमी ( संपादक: संतोष भूमकर- २०१३)
३. इंडिया इन व्हर्स, (इंग्रजी), द लिटिल मॅगझिन; (संपादक : अंतरा देव सेन- २०११ )
४. लाइव्ह अपडेट; पोएट्रीवाला (इंग्रजी); (संपादन : सचिन केतकर- २००५ )
५. आर्स पोएतिका इंटरनॅशनल फेस्टिव्हल अॅन्थॉलॉजी २०१३ (स्लोवाक) : स्लोवाकिया, (युरोप)
६. गति प्रगती; साहित्य भांडार, (हिंदी) (संपादक : चंद्रकांत पाटील -२००६)
७. स्वातंत्र्योत्तर मराठी कविता, विजय प्रकाशन (मराठी) (संपादक : अनिल नितनवरे -२०१५)
८. वाक बिनाले फेस्टिवल अॅन्थॉलॉजी, रझा फाउंडेशन, दिल्ली (द्विभाषिक) - -२०१६
९. द पोएट मॅगझीन, युके (इंग्रजी) – अॅन्थॉलॉजी - विंटर-२०२०, स्प्रिंग-२०२१, ऑटम २०२१, स्प्रिंग-२०२१, स्प्रिंग-२०२२, विंटर-२०२२
१०. ‘काव दिशावान’ (पंजाबी) ‘भारतीय कविता’, पंजाबी अनुवाद आणि संपादन – सतपाल भिक्की, तरसेम, गुरदीप सिंग (२०२२)
११. मराठी कविता का समकाल (हिंदी): विजया बुक्स, दिल्ली, अनुवाद आणि संपादन: प्रकाश भातंब्रेकर (२०१८)
१२. कविता के साये में शब्द (हिंदी) ) महाराष्ट्र राज्य हिंदी साहित्य अकादेमी, मुंबई, अनुवाद आणि संपादक : सुनील देवधर (२०२४)
१३. सेंट ऑफ रेन (इंग्रजी) (संपादक – अश्वनी कुमार), रेड रिव्हर, दिल्ली (२०२५)
कवितावाचन
संपादनसाहित्य अकादेमी, मुंबई, ‘कवी-संधी’-एकल कवितावाचन (२०२०)[८]
साहित्य अकादेमीतर्फे दिल्ली, मुंबई, पुणे, उज्जैन इ.,
हिंदी साहित्य अकादेमी, (दिल्ली),
मुंबई विद्यापीठ (मुंबई), काला घोडा महोत्सव (मुंबई), वाक पोएट्री बिनाले- रझा फौंडेशन (नवी दिल्ली-२०१७), बनारस हिंदू युनिवर्सिटी (बनारस-२०१६), टाटा लिटरेचर फेस्टिव्हल, (मुंबई-२०२१), केरळ लिटरेचर फेस्टिवल (कोझिकोड, केरळ-२०१९), नॅशनल गॅलरी ऑफ मॉडर्न आर्ट, मुंबई (२०१७), मुंबई दूरदर्शन व आकाशवाणी मुंबई, अ. भा. मराठी साहित्य संमेलन, पुणे व इतर ठिकाणी, इम्फाळ लिटरेचर फेस्टिव्हल (इम्फाळ, मणिपूर, -२०२१), कादंबिनी लिटरेचर फेस्टिव्हल, भुवनेश्वर (२०२२), विश्वरंग, भोपाळ, (२०२३), जनवादी लेखक संघ, अलाहाबाद (२०२४), भारत भवन, भोपाळ (२०२३), भारतीय विद्या भवन, मुंबई (२०२३), आर्स पोएतिका काव्य महोत्सव (ब्रातीस्लावा, स्लोवाकिया-२०१३), चार्लस युनिवर्सिटी (प्राग, चेक रिपब्लिक-२०१३), जागतिक मराठी संमेलन (दुबई-२०१०), पोएट्स अॅनोनिमस व पोएट्री सोसायटी ऑफ व्हर्जिनिया (यूएसए-२००३), चंद्रभागा पोएट्री फेस्टिव्हल, कोणार्क (२०२४), जॉन अॅशबेरी रिसोर्स सेंटर, फ्लो चार्ट फौंडेशन, हडसन, न्यू यॉर्क (२०२५), अल्बनी (२०२५), लॉस एंजेलिस (२०२५) इत्यादी देशातील आणि परदेशातील काही ठिकाणी कवितावाचन.
प्रफुल्ल शिलेदार यांच्या कवितांचे विश्लेषण
संपादनडॉ. केशव सखाराम देशमुख यांनी 'पायी चालणार' काव्यसंग्रहावर महाराष्ट्र टाईम्समध्ये लेख लिहिलेला आहे. त्यात ते लिहितात:
“'पायी चालणार' काव्यसंग्रहातील शिलेदारांची ही समग्र कविता आशयविस्तारक म्हणून आणि 'कविपण' पणाला लावण्याच्या गुणवत्तेवरही फारच महत्त्वाची कविता मानावी लागेल. 'खूप माणूस होऊन जगायचंय / खूप माणूस होऊन जगायचंय / पुटपुटत खिसे चाचपडताना / गवसावा हरवलेला बंदा रुपया' अशी पक्की धारणा स्वीकारत शिलेदार या काव्यसंग्रहाचा शेवट करतात; त्यावेळी, सभोवताली एक भयंकर कोलाहल माजलेला आहे; आणि अशा कोलाहलात एखाद्या थोर संताने मानुषतेसाठी प्रार्थनेचे शब्द समाजाच्या गाभाऱ्यात पेरून द्यावेत; त्याच पद्धतीची महन्मंगल भावधारा या कवितेच्या संपूर्ण रचनेच्या खोल तळाशी आहे, हे अगदीच खरे. या कवितेतील फारच महत्त्वाचा स्वर जर कोणता असेल तर तो आहे की, ही कविता जगण्याविषयीचे कुतूहल अबाधित ठेवते. मानवी जगण्याच्या तळांपर्यंत पोहचण्याचे या एकूण कवितेचे ध्येयसूक्त हा तर 'पायी चालणार' काव्यसंग्रहाचा अगदी प्रधान अशा स्वरूपाचा धागा ठरतो.”
हा संपूर्ण लेख महाराष्ट्र टाईम्सच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.[९]
कवयित्री अंजली कुलकर्णी यांनी 'पायी चालणार' या कवितासंग्रहाचे लोकसत्तामध्ये परीक्षण केलेले आहे. त्यात त्या लिहितात:
'वर्तमानावरचे निर्भीड भाष्य'
प्रफुल्ल शिलेदार हे नव्वदोत्तरी कवितेतले एक महत्त्वाचे कवी आहेत. त्यांचा यापूर्वी 'जगण्याच्या पसाऱ्यात' हा कवितासंग्रह प्रकाशित झालेला आहे. एकूणच नव्वदोत्तर काळात सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक जीवनावर जागतिकीकरणाच्या उमटलेल्या खुणांचे, ओरखडय़ांचे अचूक आकलन त्यांच्या कवितांमध्ये दिसते. बदलांच्या या सगळ्या वादळी आवेगात सापडलेले मानवी मन, मूल्ये, संस्कृती, भाषा यांसह मानवी जगण्याला आलेले भरकटलेपण आणि दिशाहीनता त्यांनी कवितेमधून अचूक टिपली आहे.
हा संपूर्ण लेख लोकसत्ताच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. [१०]
पुरस्कार
संपादनविशाखा पुरस्कार (नाशिक-१९९३), शरच्चंद्र मुक्तिबोध काव्य पुरस्कार (वि. सा. संघ, नागपूर- २००६), केशवसुत पुरस्कार (महाराष्ट्र शासन-२००६), गांधी स्मारक निधी अनुवाद पुरस्कार (नागपूर-२००९), बाळशास्त्री जांभेकर अनुवाद पुरस्कार (मुंबई-२०१४), मारवाड़ी फाउंडेशन साहित्य गौरव पुरस्कार, (मुंबई-२०१७),
बाराशिव कविता पुरस्कार (परभणी-२०१८)[११]
लोकमंगल साहित्य पुरस्कार (सोलापूर-२०१८),
साहित्य अकादमी अनुवाद पुरस्कार (२०१८) (नवी दिल्ली)[१२] [१३]
कवीवर्य कुसुमाग्रज साहित्य पुरस्कार (मराठवाडा साहित्य परिषद, औरंगाबाद-२०२१),
पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील विशेष साहित्य पुरस्कार, (प्रवरानगर-२०२४) इत्यादी.
सन्मान
संपादन१. आर्स पोएतिका इंटरनॅशनल पोएट्री फेस्टिवल, ब्रातीस्लावा, स्लोवाकिया येथे कविता वाचनाकरता आमंत्रित (२०१३)
२. आकाशवाणी प्रजासत्ताक दिन राष्ट्रीय कविसंमेलनात (२०१३) सहभाग व बावीस भारतीय भाषांमध्ये कवितेच्या अनुवादाचे प्रसारण.
३. संमेलनाध्यक्ष, चौथे समाज साहित्य विचार संमेलन, मालवण जि. सिंधुदुर्ग (२०२४) [१४]
४. आर्ट ओमाय, इंटरनॅशनल रायटर्स रेसिडेन्सी, न्यू यॉर्क येथे फेलो रायटर म्हणून वास्तव्य (२०२५)[१५]
५. अनेक विद्यापीठांमध्ये भाषेच्या अभ्यासक्रमात कवितांचा समावेश
संदर्भ व टीप
संपादन- ^ हा देश पायी चालणाऱ्यांचाच आहे! (२०१८-११-२४). "पायी चालणार' या कवितासंग्रहाचे परीक्षण : डॉ. प्रमोद मुनघाटे". थिंकमहाराष्ट्र.
- ^ इंग्रजीत अनुवाद झालेल्या काही कविता. "Poetry India यावरील इंग्रजी कविता". poetryindia.
- ^ हिंदी समय में प्रफुल्ल शिलेदार की रचनाएं. "हिंदी समय इथे प्रकाशित झालेल्या काही कविता". HindiSamay.
- ^ इस बहते समय की दरारें. "हिंदीत अनुवादित झालेल्या काही कविता". सदानीरा साईट.
- ^ एबीपी माझा चॅनेल. "(आनंदाचे पान : पूल नसलेली नदी या अनुवादित पुस्तकाबाबत मुलाखत )". एबीपी माझा.
- ^ "ज्ञानेन्द्रपती यांच्या संशयात्मा कविता संग्रहाचे परीक्षण". महाराष्ट्र टाइम्स.
- ^ Interview of Prafull Shiledar, 2025-04-01. "The Bangalore Review".CS1 maint: numeric names: authors list (link)
- ^ साहित्य अकादेमी आयोजित कार्यक्रम (२०१९-०६-०४). "साहित्य अकादेमी, मुंबई, 'कवी-संधी'-एकल कवितावाचन (२०२०)" (PDF).
- ^ डॉ. केशव सखाराम देशमुख यांचा लेख (२०१८-०५-२७). "कविपण पणाला लावलेली कविता". महाराष्ट्र टाईम्स.
- ^ कवयित्री अंजली कुलकर्णी यांनी 'पायी चालणार' या कवितासंग्रहाचे लोकसत्तामध्ये केलेले परीक्षण (२०१७-०९-१०). "'वर्तमानावरचे निर्भीड भाष्य'". लोकसत्ता.
- ^ डिसेंबर २०१८चा बाराशिव साहित्य पुरस्कार प्रफुल्ल शिलेदार यांच्या ‘पायी चालणार’ या कवितासंग्रहाला प्रसिद्ध कवी इंद्रजित भालेराव यांच्या हस्ते देण्यात आला. त्या वेळी त्यांनी केलेलं हे भाषण… (२०२१-०१-२२). "इंद्रजित भालेराव यांच्या भाषणाचा अंश". अक्षरनामा.
- ^ प्रफुल्ल शिलेदार यांना साहित्य अकादमी अनुवाद पुरस्कार (२०१८). "लोकमतमधील बातमी".
- ^ प्रफुल्ल शिलेदार यांनी व्यक्त केलेला विचार (२०१९-०२-०२). "लोकसत्ताला भेट व संवाद". लोकसत्ता.
- ^ काळाचे भान म्हणजे परिवर्तनाचे भान (२०२४-१२-१७). "(अध्यक्षीय भाषण, चौथे समाज साहित्य विचार संमेलन, मालवण, २०२५ )". साप्ताहिक साधना.
- ^ (आर्ट ओमाय, न्यूयॉर्क येथे आंतरराष्ट्रीय लेखक निवासवृत्तीसाठी निवड, एप्रिल २०२५) लेखक परिचय. "Art Omi: Writers 2025 Spring".CS1 maint: multiple names: authors list (link)