प्रधानमंत्री उज्ज्वला योजना

प्रधानमंत्री उज्ज्वला योजना (इं:Pradhan Mantri Ujjwala Yojana) ही भारत सरकारद्वारा सन २०१६मध्ये विमोचित केल्या गेलेली एक योजना आहे.


प्रधानमंत्री उज्वला योजनेचे उद्देश: या योजनेद्वारे भाररातील दारिद्ऱ्य रेषेखाली असणाऱ्या सुमारे ५ कोटी महिलांना घरघुती एलपीजी गॅस जोडण्या देण्यात येणार आहेत.

योजनेचे उद्देशसंपादन करा

  • महिलांचे सक्षमीकरण व त्यांच्या आरोग्याची निगा राखणे.
  • स्वयंपाक करतांना लाकडी जळण वापरण्यामूळे होणारे दुष्परिणाम कमी करणे.
  • स्वयंपाकासाठी अस्वच्छ जळण वापरल्यामुळे भारतात होणारे मृत्यू कमी करणे.
  • घरात लाकडी जळण वापरल्यामुळे लहान बालकांना बऱ्याच मात्रेत होणाऱ्या श्वासोच्छ्वासाच्या तक्रारी दूर करणे

तपशीलसंपादन करा

"प्रधानमंत्री उज्ज्वला योजना" ही एक भारत सरकारची, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्याद्वारे सन २०१६ मध्ये विमोचित केली गेलेली कल्याणकारी योजना आहे.[१][२]

यात, २१ जुलै २०१६ च्या आकडेवारीनुसार लाभार्थ्यांना सुमारे १७,६६,२५४ जोडण्या दिल्या गेल्या..[३]

संदर्भसंपादन करा

  1. ^ टाईम्स ऑफ इंडिया: "उज्वला योजनेत दारिद्ऱ्य रेषेखालील कुटुंबाना रु.९९० मध्ये एलपीजी शेगडी मिळणार" Check |दुवा= value (सहाय्य). टाईम्स ऑफ इंडिया.
  2. ^ इंडियन एक्सप्रेस: "प्रधानमंत्री उज्वला योजना : 'यूपीए सरकारने वंचितांना अदत्त ठेवले, ज्याद्वारे आम्हास त्रास होत आहे'" Check |दुवा= value (सहाय्य). इंडियन एक्सप्रेस.
  3. ^ "ओरिसाडायरी.कॉम हे संकेतस्थळ". Archived from the original on 2016-08-18. 2016-10-12 रोजी पाहिले.