सूचना
खालील माहिती वैद्यकीय सल्ला नाही. कोणत्याही आजारासाठी आपल्या डॉक्टरकडूनच सल्ला घ्यावा.
  • शक्यतो प्रथमोपचारांवर आधारित माहितीपर पुस्तकही सोबत असावे.

१. निर्जंतुक (स्टर्लाइज्ड) ‘गॉज ड्रेसिंग्स्’

२. स्टीकींग प्लास्टर रोल्स (Sticking Plaster Roll)

३. चिकट ड्रेसिंग (बॅण्ड एड) व चिकट पट्ट्या (सर्व आकार)

४. कोपर, गुडघा अथवा घोटा बांधण्यासाठी ‘क्रेप बँडेजेस्’ (Crepe Bandages )

५. गुंडाळपट्ट्या (रोलर बँडेजेस्)

६. त्रिकोणी पट्ट्या (ट्रँग्युलर बँडेजेस्)

७. कापसाची गुंडाळी : १०० ग्रॅम

८. विविध मदतपर, आवश्यक व अतिआवश्यक [वैद्यकीय तसेच वाहतूक] सेवेतील संपर्क क्रमांक अन् पत्ते लिहिलेली वही.

औषधे

१. ‘डेटॉल’ किंवा ‘सॅवलॉन’

२. ‘बेटाडीन’ किंवा ‘सोफ्रामायसीन’ बरनॉल, कैलास जीवन सारखी आवश्यक मलमे .

३. ‘पॅरासिटामॉल’ गोळी (५०० मि.ग्रॅॅ.)

४. 'ग्लिसरीन

प्रथमोपचाराची साधने

१. एकवापर (डिस्पोजेबल) हातमोजे आणि ‘फेस मास्क’

२. सेफ्टीपिन्स, चिमटा (फोरसेप-ट्विजर), तापमापक (थर्मामीटर)

३. ‘सर्जिकल’ कात्री (१२ सें.मी. लांबीची)

अन्य साहित्य

  • हात धुण्यासाठी जंतुनाशक साबण आणि रूमाल


प्लास्टिकचा स्वच्छ कागद : रुग्णाच्या छातीत तीक्ष्ण हत्यार घुसल्यास किंवा त्याच्या छातीला बंदुकीची गोळी लागल्यास हा प्लास्टिकचा स्वच्छ कागद उपयोगी पडतो.

जखम स्वच्छ करण्यासाठी वापरलेल्या बोळ्यांची / पट्ट्यांची नंतर योग्य विल्हेवाट लावण्याच्या दृष्टीने बोळे / पट्ट्या साठवून ठेवण्यासाठी प्लास्टिकची वा कागदी पिशवी.

विजेरी (टॉर्च).