प्रतिष्ठान (नियतकालिक)

प्रतिष्ठान हे मराठी भाषेतुन निघणारे वाङ्मयीन नियतकालिक, मराठवाडा साहित्य परिषदेचे मुखपत्र आहे. सप्टेंबर १९५३ साली गणेशचतुर्थीच्या दिवशी याचा पहिला अंक हैदराबाद येथे प्रसिद्ध झाला. सप्टेंबर १९५७ मध्ये औरंगाबाद येथे परिषदेचे कार्यालय गेल्यानंतर ‘हे नियतकालिक तेथून प्रकाशित होत आहे. मराठवाडा साहित्य परिषदेने ठरविलेल्या ध्येय धोरणांना अंमलात आणण्यासाठी परिषदेचा हेतू समोर ठेवून ‘प्रतिष्ठान’ ने आपली वाङ्मयीन वाटचाल केलेली दिसते.

संपादक संपादन

मराठवाडा साहित्य परिषदेचे ‘प्रतिष्ठान’ नावाचे मुखपत्र आहे. प्रा. डाॅ. ना.गो.नांदापूरकर, दा.गो.देशपांडे, भगवंत देशमुख, तु.शं. कुलकर्णी, सुधीर रसाळ,नागनाथ कोत्तापल्ले, महावीर जोंधळे, बाळकृष्ण कवठेकर, रवींद्र किंबहुने , लक्ष्मीकांत सखाराम तांबोळी हे मुखपत्राचे आजवरचे संपादक आहेत. त्यानंतर आसाराम लोमटे हे संपादक झाले. [१]

विशेषांक संपादन

'प्रतिष्ठान हे नियतकालिक कथा, कविता, लेख, ललित लेख, व्यक्तिचित्रणे, नाटिका, टिपणे, कादंबरीची अप्रकाशित प्रकरणे, संहिता, पुस्तकपरीक्षणे, चर्चा, भाषणे, वाचकांचा पत्रव्यवहार इत्यादी लेखन प्रसिद्ध करत आले आहे. तसेच त्यांचे विशेषांकही प्रसिद्ध झाले आहेत.

संमेलन विशेषांक संपादन

'प्रतिष्ठान'ने संमेलन विशेषांक प्रकाशित करून संमेलनातील विचार लोकांपर्यंत पोहचवण्याचा प्रयत्न केला.

  • मराठवाडा साहित्य संमेलन विशेषांक (जाने. १९५६)
  • ९ वे म. सा. सं. विशेषांक(फेब्रु. ६१)
  • १० वे म. सा. सं. विशेषांक (जाने. ६२)
  • ११ वे म. सा. सं. विशेषांक(एप्रिल-मे-जून ५६)
  • १२ वे म. सा. सं. विशेषांक (जाने. ६८)
  • १३ वे म. सा. सं. विशेषांक (जाने. ६९)
  • १४ वे म. सा. सं. विशेषांक (फेब्रु-मार्च-एप्रिल ८१)
  • १५ वे म. सा. सं. विशेषांक (मार्च-एप्रिल ८२)
  • १६ वे म. सा. सं. विशेषांक (सप्टें. ८८ ते फेब्रु. ८९)
  • १७ वे म. सा. सं. विशेषांक (मे-जून ९०)
  • १८ वे म. सा. सं. विशेषांक (नोव्हें.-डिसें.९२)
  • २१ वे म. सा. सं. विशेषांक (मे-जून २००१)
  • २२ वे म. सा. सं. विशेषांक (जाने.-फेब्रु.०२)
  • २३ वे म. सा. सं. विशेषांक (मे-जून ०२)
  • २६ वे म. सा. सं. विशेषांक (नोव्हें-डिसें ०४)
  • ७७ वे अखिल भारतीय साहित्य संमेलन विशेषांक (जाने.-फेब्रु. ०५)
  • २७ वे म. सा.सं. विशेषांक (जुलै ते ऑक्टो. ०६)
  • पहिले विश्व मराठी साहित्य संमेलन विशेषांक (मे-जून ०९)
  • ३१ वे म. सा. सं. विशेषांक (नोव्हें.-डिसें.१०)
  • पहिले लेखिका साहित्य संमेलन विशेषांक (जाने.-फेब्रु.११)
  • ३४ वे म. सा. सं. विशेषांक (मे-जून १३)
  • दुसरे मराठवाडा लेखिका साहित्य संमेलन विशेषांक (सप्टें.-ऑक्टो.२०१३)
  • ३५ वे म. सा. सं. विशेषांक (मे-जून १४)
  • ३६ वे म. सा. सं. विशेषांक (जाने.-फेब्रु. १६)
  • ३७ वे म. सा. सं. विशेषांक (मार्च-एप्रिल २०१६)[२]

व्यक्ती, साहित्यकृती विशेषांक संपादन

  • ‘संत नामदेव विशेषांक’ (जाने. ते एप्रिल १५)
  • ‘समीक्षा विशेषांक’(मे- जून १५) [२]

संदर्भ संपादन

संदर्भसूची संपादन

  • मोरे, संगीता. ‘प्रतिष्ठान’ ची सूची.
  • मोरे, संगीता. ‘प्रतिष्ठान’चे वाङ्मयीन कार्य.

बाह्य दुवे संपादन