महाराजा प्रताप सिंह हे जयपूर राज्याचे एक राजा होते.

महाराजा प्रताप सिंह हे महाराजा माधो सिंह (प्रथम) यांचे पुत्र होते. त्यांचा जन्म २ डिसेंबर १७६४ या दिवशी झाला.

कार्यकाळ

संपादन

महाराजा प्रताप सिंह यांनी १७७८ ते १८०३ या काळात जयपुरवर शासन केले. जयपूर नगरातील प्रसिद्ध 'हवामहाल' या वास्तूची निर्मिती महाराजा प्रताप सिंह यांनी केली.

मृत्यू

संपादन

महाराजा प्रताप सिंह यांचा मृत्यू १ ऑगस्ट १८०३ या दिवशी झाला.