प्रकाश खांडगे

(प्रकाश खांडके या पानावरून पुनर्निर्देशित)


प्रा. डॉ. प्रकाश खांडगे (इ.स. १९५७:पिंपळगाव, पुणे जिल्हा, महाराष्ट्र - ) हे लोकसाहित्याचे अभ्यासक, पत्रकार व लेखक आहेत.

खांडगे ह्यांनी ’जागरण : एक विधिनाट्य इतिहास, वाङ्मय, प्रयोग’ या नावाचा प्रबंध मुंबई विद्यापीठाला सादर करून पीएच.डी. मिळवली. या प्रबंधास सर्वोत्कृष्ट प्रबंधाचा प्रा. अ.का. प्रियोळकर पुरस्कार प्राप्त झाला होता.

बालपण आणि नंतर

संपादन

शिवनेरी किल्याच्या पायथ्याशी असलेले पिंपळगाव हे खांडगे यांचे गाव. पिंपळगावच्या पंचक्रोशीला संतांची, शाहिरांची व तमाशा कलावंतांची परंपरा लाभली आहे. वारकरी, कीर्तनकार अन् विठाबाई नारायणगावकर, दत्तोबा तांबे शिरोलीकर, दत्ता महाडिक पुणेकर, दादू इंदुरीकर अशा कलावंतांचा हा परिसर आहे. या परिसरात डॉ. खांडगे यांचा जन्म झाला.

शिक्षणासाठी प्रकाश खांडगे मुंबईला आले. परळमधील खुराडेवजा घरात राहू लागले. उपजीविकेसाठी त्यांनी रस्त्यावर, दुकाना-दुकानात जाऊन पापड विकले. मोठा कष्टाने शिकले. पुढे त्यांच्या जीवनात एका बहुराष्ट्रीय कंपनीत जनसंपर्क अधिकारी, साखळी गटाच्या एका वर्तमानपत्रात वरिष्ठ उपसंपादक, नंतर प्राध्यापक अशी स्थित्यंतरे घडून आली.

लोककलांचा अभ्यास

संपादन

डॉ. खांडगे म्हणजे, लोककलांचा चालताबोलता इतिहास आहे. लोककला हाच त्यांचा ध्यास आणि श्वास आहे. त्‍यांना खंडोबाचे जागरण घालणाऱ्या शाहीर शंकरराव धामणीकरांचा आणि दादू इंदुरीकर, दत्तोबा तांबे या तमाशा कलावंतांचा सहवास लाभला. या पारंपरिक वाघ्यांकडून अनेक कवने, कथा, खांडगे खांडक्यांनी संग्रहित केल्या. लोककलांवरील राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय परिषदांमध्ये त्यांचा सक्रिय सहभाग असतो.

डॉ प्रा. प्रकाश खांडगे हे मुंबई विद्यापीठातील लोककला अकादमीचे समन्वयक आहेत. तसेच त्यांना ठाणे भूषण आणि शिवनेरी भूषण पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले आहे.

प्रकाश खांडगे यांची पुस्तके

संपादन
  • खंडोबाचे जागरण (हा ग्रंथ प्रा. डॉ. प्रकाश खांडगे यांच्या पीएच.डी.च्या प्रबंधावर आधारित आहे. )
  • नोहे एकल्याचा खेळ (आत्मकथन; शब्दांकन नेहा किशोर सावंत यांचे)
  • भंडार - बुका