ज्या वस्तूवर् किंवा पृष्ठभागावर प्रकाश पडला असता त्याच्या भौतिक किंवा रासायनिक गुणधर्मात बदल होतो त्याला प्रकाशसंवेदी म्हणतात.

प्रकाशसंवेदी वस्तूंची उदाहरणे म्हणजे आपली त्वचा, डोळे, झाडाची हिरवी पाने, कॅमेऱ्यामधील फिल्म अथवा सेन्सर.