प्यू संशोधन केंद्र तथा प्यू रिसर्च सेंटर (Pew Research Center) अमेरिकेच्या वॉशिंग्टन, डी.सी. मध्ये स्थित एक संशोधनसंस्था आहे. या संस्थेची स्थापना १९९० मध्ये झाली, ही प्यू चॅरिटेबल ट्रस्टच्या मालकीची संस्था आहे.[१] ही संस्था युनायटेड स्टेट्स आणि जगाला आकार देणाऱ्या सामाजिक समस्या, जनमत आणि लोकसंख्याशास्त्रीय कल याविषयी माहिती प्रदान करते. तसेच ही संस्था सार्वजनिक मत सर्वेक्षण, लोकसंख्याशास्त्रीय संशोधन, यादृच्छिक नमुना सर्वेक्षण संशोधन आणि पॅनेल आधारित सर्वेक्षणे,[२] मीडिया सामग्री विश्लेषण आणि इतर सामाजिक बाबींवर संशोधन करते.[३][४]

प्यू संशोधन केंद्र
स्थापना 2004
चेयरमन रॉबर्ट ग्रोव्हस
Head माइकल डिमॉक
स्थान वॉशिंग्टन, डी.सी., अमेरिका
पत्ता 1615 एल स्ट्रीट, एनडब्ल्यू सुट 800
वाशिंगटन, डी.सी.
संकेतस्थळ www.pewresearch.org

संशोधनाचे विषय संपादन

संस्थेच्या संशोधनामध्ये खालील विषयांचा समावेश असतो:[५][६]

  • अमेरिकेचे राजकारण आणि धोरणे
  • पत्रकारिता आणि माध्यम
  • इंटरनेट आणि तंत्रज्ञान
  • वंश आणि जात
  • धर्म आणि सार्वजनिक जीवन
  • जागतिक दृष्टिकोन आणि कल
  • सामाजिक आणि लोकसंख्याशास्त्रीय कल

संदर्भ संपादन

  1. ^ "प्यू संशोधन केंद्र बद्दल".
  2. ^ "Our survey methodology in detail". Pew Research Center Methods (इंग्रजी भाषेत). Archived from the original on March 1, 2021. 2021-03-26 रोजी पाहिले.
  3. ^ Lesley, Alison (May 18, 2015). "Pew Research Finds Jews & Hindus are More Educated & Richer". World Religion News. Archived from the original on June 23, 2018. December 28, 2015 रोजी पाहिले.
  4. ^ "Company Overview of The Pew Charitable Trusts". Bloomberg L.P. December 29, 2015. Archived from the original on June 23, 2018. December 29, 2015 रोजी पाहिले.
  5. ^ Pew Research Center (n.d.). "About Pew Research Center". Archived from the original on July 22, 2018. June 16, 2021 रोजी पाहिले.
  6. ^ Pew Research Center (n.d.). "Research Topics". Archived from the original on June 16, 2021. June 16, 2021 रोजी पाहिले.