प्यारी-यारी (वेब मालिका)

(प्यारी-यारी वेबसीरीज या पानावरून पुनर्निर्देशित)

प्यारी-यारी ही मराठी मधील गोष्ट रूपाने प्रदर्शित केली जाणारी पहिलीवेबसीरीज असून ती नोव्हेंबर २०१६ मध्ये प्रदर्शित झाली. अमेय रमेश परुळेकर यांनी या वेबसीरीजचे दिग्दर्शन केले असून, लेखन अमेय रमेश परुळेकर आणि हर्षल आल्पे यांनी लिहिली आहे.

ही मालिका परुळेकर यांच्या युट्युब वाहिनीवर [१] प्रदर्शित करण्यात आलीआहे. ह्या मालिकेचे प्रथम सत्र हे  एकूण ८ भागांचे आहे. या मालिकेचे चित्रांकन पुणे परिसरात केले गेले. शिवेंदू मेनन यांनी मालिकेचे चित्रांकन व संकलन केले आहे. मालिकेचे पार्श्वसंगीत विपुल वर्तक, शीर्षक गीत प्रसाद ओझरकर, डीजे सनी, डीजे सीड, अखिलेश केळकर तर हिंदी गीत यश मखिजा यांनी दिले आहे.

या मालिकेला एक लाखांहून अधिक प्रेक्षक आहेत. []


प्यारी-यारीची कथा एकाच घरात राहणाऱ्या ४ तरुण मित्रांची आणि त्यांच्या एकमेकां मधल्या नात्याची आहे. एक पत्रकार सुरेश बगळे , एक कवी देवदत्त , एक दिलफेक प्रेमिक राहुल आणि एक ऍक्टर रॉंनी असे हे चार जण व त्यांच्या शेजारी नुकतीच नव्याने राहावयास आलेली एक तरुण मुलगी प्रीशा यांच्या भोवती कथानक फिरते.

त्यानंतर शेजारी आलेल्या नायिकेच्या प्रेमात पडणाऱ्या या चार मुलांना कळते कि प्रीशा ही अगोदरच एका नात्यात असून त्याचे नाव भूषण आहे, हे कळल्या वर चौघांची होणारी घालमेल आणि त्यातच एका नवीन नायिकेने केलेला केलेला प्रवेश आणि त्यातूनच होणाऱ्या घडामोडी यात दाखविलेल्या आहेत.

अभिनेते

संपादन

या मालिकेतील अभिनेते मुंबई, पुणे, बेळगावचे आहेत.

  • राहुल - प्रसाद ओझरकर उर्फ पॉज (दिलफेक प्रेमिक)
  • देवदत्त - अखिलेश केळकर (कवी व लेखक)
  • रॉनी - चिन्मय सुधीर शेंडे (स्ट्रगलिंग अभिनेता)
  • सुरेश बगळे - हर्षल आल्पे (पत्रकार व उपसंपादक)
  • प्रीशा - वर्षा बहुलीकर
  • रीचा - आकांक्षा बेंगळे

चिरागच्या भूमिकेत सागर जोशी व धन्नोच्या भूमिकेत धनश्री येडगावकर हे सहायक अभिनेते आहेत. शैलेश लेले, अमेय रमेश परुळेकर, अश्विन होले, प्रियेशा सिंह व सुबोध अहिरराव यांनी छोट्या भूमिका केल्या आहेत.

  1. ^ [२][permanent dead link]