ज्यांना कमी तेलकट चिवडा आवडतो त्यांच्यासाठी पातळ पोह्यांचा चिवडा हा उत्तम प्रकार आहे.तो पुढील प्रकारे करावा.

संपादन

|साहीत्यः-

  • पातळ पोहे अर्धा किलो
  • शेंगदाणे १ वाटी
  • फुटाण्याची डाळ १/२ (अर्धी) वाटी
  • सुक्या खोबऱ्याचे पातळ काप १/ ४ वाटी
  • कढीपत्ता एक वाटी
  • हिरवी मिरची तुकडे करून ८-१०
  • ,मिठ चवीनूसार
  • पिठीसाखर ऐच्छिक
  • धना-जिरा पावडर २ टीस्पून
  • तेल एक वाटी फोडणीसाठी
  • जिरे,मोहरी,हींग,तिळ फोडणीसाठी

कृती:- प्रथम पोहे नीट चाळून ,स्वच्छ करून कडकडीत उन्हात वाळवावेत.मिरचीचे पोट चिरून तुकडे करावेत.कढीपत्ता पाने धुऊन पुसून कोरडी करून घ्यावीत .फुटाण्याची डाळ निवडून घ्यावी. खोबऱ्याचे पातळ काप करावेत.

आता संपूर्ण पूर्वतयारी झाली की ,गॅसवर कढई अथवा जाड बुङाचे पातेले तापत घालून तेल घालावे. तेल तापल्यावर तेलात मोहरी,जिरे तिळ व हींग हळद घालून फोडणी तडतडवून घ्यावी.फोडणीमध्ये सग्ळ्यात आधी शेंगदाणे टाकावेत. ते थोडे तांबूस झाले की, अनुक्रमे फुटाणा डाळ,मिरची व कडीपत्ता असे सर्व टाकावे. गॅस बंदच करावा व मीठ,साखर धना-जिरा पावडर घालावी.सर्व व्यवस्थित हलवावे. शेवटी पोहे घालावेत.नीट हलवावे. जेणेकरून सर्व मिठ मसाला पोह्याना लागावा.

आता कढई परत गॅसवर ठेवावी.गॅस एकदम बारीक ठेवावा किंवा कढईखाली तवा ठेवावा म्हणजे खालून करपण्याची शक्यता रहात नाही व मंद आचेवर मधून-मधून चिवडा परतत रहावा.पंधरा-वीस मिनीटानी गॅस बंद करून टाकावा. आता तयार चिवडा व्यवस्थित गार होऊ द्यावा म्हणजे छान कुरकरीत होतो.मग हवाबंद डब्यात भरावा.

टीप्स :-

  • पोहे ऊन्हात वाळविणे सोयिचे नसेल तर पातेले गरम करून घ्यावे(गॅस बंद करावा) व त्यात आधि चिमूटभर मिठ टाकावे व नंतर पोहे टाकावेत व हलवून पंधरा मिनीट त्यातच ठेवावेत म्हणजे चिवडा कुरकूरीत होतो.मिठामूळे पोहे आकसण्याचा धोका रहात नाही.
  • तेलात सर्व मसाला मिठ घातल्याने नीट विरघळते व सगळीकडे व्यवस्थित लागते
  • खोबऱ्याचे काप पातळ व सहज करता यावेत म्हणून खोबऱ्याच्या वाट्या पंधरा मिनिट कोमट पाण्यात टाकाव्यात.

आपल्या प्रतिसादाने नव-नवीन पदार्थ करण्यास प्रेरणा मिळते. आपल्या मौल्यवान सूचना व अभिप्राय, आम्हाला ज़रूर द्या.