पोट्टी श्रीरामुलु ( तेलुगू: పొట్టి శ్రీరాములు १६ मार्च इ.स. १९०१ - १६ डिसेंबर इ.स. १९५२) हे एक भारतीय स्वातंत्र्यसेनानी होते. ते गांधीजींचे अनुयायी होते. भारतीय स्वातंत्यप्राप्तीनंतर आंध्र भाषिकांसाठी वेगळे राज्य बनविले जावे यासाठी ते आमरण उपोषणास बसले व त्यातच त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्याआधी केवळ जतीन दास यांचा आमरण उपोषणादरम्यान मृत्यू झाला होता. त्यांच्या मृत्यूनंतर तीन दिवसांनी पंडित जवाहरलाल नेहरूंनी आंध्रप्रदेश निर्माण करण्याची घोषणा केली.

पोट्टी श्रीरामुलु