पोटभाषा (किंवा बोली, किंवा उपभाषा) ही एखाद्या मुख्य भाषेचा उपप्रकार होय. अशा भाषांतून लिखित वाङ्मय बहुधा नसते. भाैगोलिक, सामाजिक व्यावसायिक, सांस्कृतिक, ऐतिहासिक भिन्नतेमुळे मुख्य भाषेची जी वेगवेगळी रूपे दिसतात, त्या तिच्या पोटभाषा असतात. एकाच भाषेच्या वेगवेगळ्या पोटभाषांमध्ये शब्दसंग्रह आणि उच्चार यात फरक असतो.

दरवर्षी अनेक पोटभाषा लुप्त होतात. ५० वर्षांत भारतातल्या २० टक्के भाषा लुप्त झाल्या.[ संदर्भ हवा ]

२०११ च्या जनगणनेनुसार भारतात २०००हून अधिक बोलीभाषा आहेत.[ संदर्भ हवा ]