अलेक्झांडर द ग्रेट याचे वडिल फिलिप दुसरा याची हत्या करणारा तरूण. हा फिलिपचा अंगरक्षक होता. काही कथांवरून तो फिलिपचा प्रेमिक होता आणि आपापसातील हेव्यादाव्यांवरून ही हत्या झाल्याचे समजते, तरी त्याला ठोस पुरावे नाहीत. काही इतिहासकारांच्या मते अलेक्झांडरचा फिलिपच्या हत्येत सहभाग असण्याची शक्यता लक्षात घेता पॉसेनियसवर अशाप्रकारचे आरोप केले जाणे सहज आहे.