पेला (इंग्रजी : ग्लास टंब्लर) हे पाणी, सरबत, दूध, ताक, मद्य किंवा तत्सम द्रव पदार्थ पिण्यासाठी वापरले जाणारे भांडे आहे. रुप्याच्या, चांदीच्या किंवा सुवर्णाच्या पेल्याला बहुधा 'प्याला' म्हणतात. ज्या पेल्यातून दारू किंवा विष पितात त्यालाही 'प्याला' म्हणतात. अलंकारिक अर्थाने सुखाचा किंवा दुःखाचा प्याला असेही शब्दप्रयोग वापरले जातात.

पेला

पाणी पिण्याच्या मराठी पद्धतीच्या भांड्याला फुलपात्र म्हणतात.

स्वरूप

संपादन

पेला हा मुख्यतः तांबे, पितळ, चांदी, स्टेनलेस स्टील या धातूचा, काचेचा, जलाभेद्य कागदाचा किंवा प्लॅस्टिकचा असतो.

पेला हा पाणी, आदी पेये पिण्यासाठी घरी, हॉटेल इ. ठिकाणी वापरला जातो.