पेद्रो मोक्तेसुमा
डॉन पेद्रो (दे) मोक्तेसुमा त्लाकावेपान इवालिकावाका हा ह्युयी त्लातोआनी दुसरा मोतेक्सुमा आणि तोलानचा राज्यकर्ता - इश्त्लिल्क्वेकावाकात्सिनची मुलगी मारिया मियावाशोच्त्सिन, ह्या उभयतांचा मुलगा होता.
दियेगो लुइस मोक्तेसुमा (इवित्ल तेमोक)ची मुले, काउंट आणि नंतरचे मोक्तेझुमा दे तुल्तेन्गोचे ड्यूक बनले. ते पेद्रो त्लाकावेपानकडून दुसऱ्या मोक्तेसुमाचे वंजश लागतात. हे ड्यू्क, त्यानंतर स्पेनला जाऊन स्थिरावले. दियेगो लुइसचा मुलगा, म्हणजेच पेद्रोचा नातु - पेद्रो तेसिफोन दे मोक्तेसुमा वाय देला क्युएवा ह्याने १९२७ मध्ये स्पेनचा चौथा फिलीप ह्याच्या मदतीने "काउंट ऑफ मोक्तेसुमा" ही पदवी पैदा केली.