पेठ अहमदपूर
पेठ अहमदपूर हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील वर्धा जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातील एक गाव आहे. गावाचे नाव नवाब अहमद खान नियाज़ी यांच्या नावावरून पडलेले आहे. बादशहा जहांगीरच्या काळात मुघल दरबार मध्ये. नवाब अहमद खान नियाझी मनसबदार होते. अहमद खान नियाझी यांची समाधी जामा मशिद या ठिकणी आहे.
?पेठ अहमदपूर महाराष्ट्र • भारत | |
— गाव — | |
प्रमाणवेळ | भाप्रवे (यूटीसी+५:३०) |
जवळचे शहर | आष्टी |
जिल्हा | वर्धा जिल्हा |
भाषा | मराठी |
बोलीभाषा | |
कोड • आरटीओ कोड |
• एमएच/ |
भौगोलिक स्थान
संपादनहवामान
संपादनयेथील हवामान वर्षभर कोरडे असते.उन्हाळ्यात अतिउष्ण असते.हिवाळा व उन्हाळा हे दोन्ही ऋतू तीव्र असतात.उन्हाळ्यात दिवसाच्या व रात्रीच्या तापमानात मोठा फरक असतो.मे हा अतिउष्णतेचा आणि जानेवारी हा कडाक्याच्या थंडीचा महिना असतो. वार्षिक सरासरी पर्जन्यमान १०९ सेंमी.पर्यंत असते.
लोकजीवन
संपादनप्रेक्षणीय स्थळे
संपादन- नवाब अहमद खान नियाझी यांच्या मार्गदर्शनाखाली मुगल साम्राज्याने बांधलेली जामा मस्जिद पेठमहादपूर. नवाब अहमद खान नियाझी मुगल दरबारात मनसबदार होते.मशिदी संकुलात शाहिद नवाब रशीद खान यांना दफन करण्यात आले
- हुतात्मा स्मारक पेठमहादपूर जो शहीद नवाब रशीद खान सदल खान यांच्या हौनरमध्ये बांधला गेला ते पेठमहादपूर या ग्रामपंचायतीजवळ आहे
- लोधी मशिद एक ऐतिहासिक मशिदी आहे जी मशिदीवरील शिलालेखानुसार इब्राहिम खान लोधी यांनी बांधली आहे. ही सहा घुमट असलेली एक छोटी मशिदी आहे.हे ग्रामपंचायत पेठमहादपूर जवळ आहे.
- मुगल साम्राज्याने बनवलेले नवाब मुहम्मद खान नियाझी आणि नवाब अहमद खान नियाझी यांचे मुकबरे जे 1651 मध्ये बांधले गेले होते. ते आज पेठमहादपूर येथे उपस्थित आहेत .या त्यांच्या दगडी कोरीव कामांसाठी प्रसिद्ध आहेत.
- हनुमान मंदिर जे अत्यंत लाभदायक आहे, ते शाहीद स्मारक पेठमहादपूरजवळ आहे.
- गजानन महाराज मंदिर हे प्रार्थनागृह आहे या प्रार्थनागृहात दरवर्षी भगवद्गीता प्रवचन होते