पॅडमॅन हा आर बाल्की दिग्दर्शित हिंदी चित्रपट असून तो ९ फेब्रुवारी २०१८ रोजी प्रदर्शित झाला आहे. चित्रपटात अक्षय कुमार मुख्य भूमिकेत असून राधिका आपटे आणि सोनम कपूरदेखील महत्त्वाच्या भूमिका निभावत आहेत. तामिळनाडू मधील कोईम्बतूर येथील अरुणाचलम मुरुगानंथम यांनी ग्रामीण भागातील स्त्रियांसाठी स्वस्त दरात सॅनिटरी नॅपकिनची निर्मिती केली आणि स्त्रियांच्या आरोग्यासाठी असे नॅपकिन वापरले जावेत म्हणून त्यांचा प्रसार, प्रचारही केला. त्यांच्या या कार्यावर हा चित्रपट आधारित आहे. चित्रपटामध्ये मासिक पाळी आणि सॅनिटरी नॅपकिनवर खुलेपणाने भाष्य करण्यात आले आहे.

भारतात आत्तापर्यंत फार खुलेपणाने बोलल्या जास्त नसलेल्या मासिक पाळी या विषयावर या निमित्ताने बरीच चर्चा घडून येताना दिसत आहे. भारतात चित्रपटाला चांगला प्रतिसाद मिळत असताना पाकिस्तानमध्ये मात्र बंदी घालण्यात आली आहे. पाकिस्तानमधील फेडरल सेन्सॉर बोर्डाने हा चित्रपटावर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. चित्रपट इस्लामी परंपरा आणि संस्कृतीविरोधात असल्याचा दावा त्यांनी केला आहे.[१]

संदर्भ संपादन

  1. ^ "पॅडमॅन (२०१८) - कथा, कलाकार, झलक".