पूर्व मावळी बोलीभाषा

पूर्व मावळी बोलीभाषा ही पुणे जिल्ह्यातील पूर्व मावळ (जून्नर,आंबेगाव,खेड,शीरूर/ ख्येड आम्बेगाव जूण्णर न शीरुळ) या विभागातील पूर्वभागातील मागील पिढीतील बहूजनांची भाषा होती. []

पूर्व मावळी बोलीभाषा ह्या बोलीभाषेची शब्दसूची
विक्शनरी, या मुक्त शब्दकोशात पाहा/तपासा/अद्याप नसलेले शब्द/वाक्यांश जोडा अथवा सूची:मराठी बोलीभाषातील शब्द येथे मराठी बोलीभाषांची सामायिक शब्दसूची पहा


भाषिक संवादाची उदाहरणे

संपादन
  • ह्या बोरीबंद्रावं येऊन गाडी पकडीपोत इथंच गडाद पडलं. आता कव्हा सरवोदेला पोहोसायचा आन कव्हाशीक जीपडं घावायचं.घराला पोचस्तव्हर तं तांबडं फुटंन.जितराबांच्या धारा कव्हाशीक निघायच्या आन कव्हाशीक दुधं घालायची.

लोकलमधल्या शीटावं बस्ताबस्त्ता आस्लं काय्काय मनात दाटत व्हतं.समद्या सकाळपुन निऱ्हा पिट्टा पल्डा व्हता.

ह्या मंबयीत यायाचं म्हयी निस्ता डोक्याचा गोयंदा व्हतोय. मोऱ्हल्या दिसाच्या कामाची पार वाट लागऽती. आन तिधं कोरटातबि ती वकीलं काय सुदरून देती नाय.कव्हा केस निकालावं निघंऽन आसं झालंय आत्ता.निऱ्ही टायमाची खोटी न पैशाचा मुडदा.ह्याच्यापरास हाती काह्यीसुधील नाय.

यळंमाळं काह्यी खायाला बी झालं न्हव्हतं. ’चाट्कनी दोन घास खाऊन येतो’ वकीलाला म्हंगालो तं त्ये गाबडीचं आयकत आस्तंऽय का?

’क्येस कव्हाबी बोरडावं येऊ शक्ती’ म्हून सारखंच भेवडीत व्हता.

येळभर पोटात दाना न्हाय.पार तव्हारी याया लाग्लि .आता सरवोदेला गेल्यावं जीपडं सुटसत्त्व्हर येखांदोन रोट्या न आंडाकरी हादाडल्याबिगार व्हायाचं नाय.आन वर एखांदी म्याक्डॉल नाह्यतं बीपीची कॉटर लावली तं एकच लंबर काम व्हईन.पर नकं तेच्यायला.सण्कष्टी चतुर्थीचीबी प्येला म्हनून मंडळी लयीच औदान करीन उद्याच्याला.आख्ख्या दिवसाची आय्झेड व्हऊन जाती तिच्या बडबडीनी. नवरा प्येला म्हंगालं का तिच्याइक्त्या घान तोंडाची बाई न्हायी गवसायची कुढंयबी. च्यायला तिलायबी केंधूळ फोन करायचा व्हता. पार भुस्काट झालंय मस्ताकाचं. पह्यला फोन लावाय पायशेन. पॉऱ्हसुदील वाट पघत आस्तीन ना.येळभर टायीमच नाय घावला त्येला म्या तरी काय कर्ण्हार.पॉऱ्हान्नापन काह्यतरी कापडंचॉपडं नाह्यतं निदान खायाला तरी काही घ्ययाला पायशेन व्हतं.ह्या वकिलान्च्या लफड्यात तेसुधील राहूनच ग्यालं च्यायला.

आता फोनवं तरी त्यान्च्याबराबर बोलावा असा इचार करीत पॅंडीच्या खिशात हात घातला तं काय. आत्त्यायला, मोबायीलचं डबडं कुढं घावातंय.दुसऱ्या खिशात ह्ये का काय म्हनून तिधं हात घालितो तं तिधंय काय हे? ..घंटा?? बंडीच्या खिशात्बी कुढं गवसातंय ते डबडं. आयला. झालंक्काय याचंबी वाटुळं. मागल्या आखिदीला तं घ्येतला व्हता.जुनं डबडं वावरात रातच्या वक्ती कांद्याला बारं द्येतानी कुढं उलाथलं कळालंबी नाय.आत्ता ह्येयबी डबडं ग्यालं तं आटापलंच म्हंगायचं न काय.

पर एवढ्यात काय पघतोऽऽ... हा सामनीच्या शीटाव्हर्ला बांडा खाली वाकूवाकू काह्यीतरी चापशीत होता.मी पघऽतोय, तव्हर तं बांड्यानी मोबाईल उचाल्लासुधील. आत्याह्यला मिव्हं. नदरंसामनी वाटमारी. लयीच बाराबोड्याचं ब्याणं दिसातयं कनी. आत्ता चिप राहून चालातं काय. ’ओ भाऊ वो मेरा फोन का चोरी किव कर्ता है रे तू. नीच्ये पडा व्हता वो मेरेवाला फोन हये. गपचित रिटन करनेका,नाह्यतं इद्दरच ऱ्हाडा कर्ता की नाय मय द्येक बे तू!’ म्या त्याच्यावं डाफार्लो.

’च्यल ये, तेरा कायका फोन रे? ह्ये तं माव्हाच फोन हे.उगं डोक्याची कल्हयी नाय पायशेन पग.' त्ये बी बांडगुळ माह्यावं आराल्डं.

च्यायला आपलाच दिसाऽऽतंय बाण्ड्गुळ... आसून्दे मरुन्दे. मोबायील चोरितो म्हन्जी काय. 'बापाची पेंड ह्ये काय रं? इक्डं आन पह्यला मोबायील. मोबायील माव्हा ह्ये सांगऽऽतोय पग तुला गैबान्या. डोक्यात शिरातयना बॉल्लिलं. का दिव येक ठुण उल्ट्या हाताची मुस्काडावं .. सुक्काळीच्या. पानीबी मागाय्च्या लाय्कीचा ऱ्हायचा न्हाईस पग.' बोलाय लागलो मंग मी कोन्च्याच बापाचा न्हाय. गप ये किडंपड्या. ईजार पिवळी करून घ्याय्ची हावस सुट्ली न क्काय तुला भूसनाळ्या.जाव्दें जाव्दें म्हणितोय तं ह्ये तं लयीच उगीरवानी बोलातंय. सोंड्या काय बोलाय कमी करित न्हव्हता.

आपल्याच्यानि हा काय आघत नाय आत्ता. माव्ही तं पार अक्कालच गुल व्हया लाग्ली न काय. आत्ता चिप बसनं म्हयी गोट्या कपाळात जायची बारी. "ये यड्याभोकाच्या नाय तुला इधं उल्टा टांगुन मिर्चीच्या धुऱ्या दिल्या ना,तं म्याबी येकाच बापाचा न्हाय."

तरी ते आराल्डंच "ह्ये पग तुला लाष्टचं सांगतो. ह्यो मोबायील माव्हा हे. म्हन्जी म्हाव्हाच ह्ये.म्होरं जर का बोल्लास ह्येंबाड्या आत्ता तं समदं बत्तीस्च्या बत्तीस नरढ्यात ग्येलंच म्हून पग तुपलं,आन त्येय बि येकाच फैटीत. "

"आरं नकं नकं. आसं कुढं करीत आस्त्यात का राव." म्या आप्ला हाळुस रिवस ग्येर टाखुन ठुला.

तं जखाळं काय म्हणितंय.."कस्सा बराबर आण्हला का ल्हायनीवं."

"न्हाय त्ये आसं ह्ये पग. तु मस समदं दात नरढ्यात घालशिन. पर त्ये काल्च्या बाजार्ला मंडळीनी नयीनच्या नयीन कोल्गेट्ची टूप आनुन ठुली, ती काय माव्ह्या ढुंगावं घसरित बसु का काय रोज सकाळ्च्याला. आरं शंबर रुपय जातिनना माव्हं निस्कारन वायाला" म्या ह्ये बोलाय्ची खोटी, समदा रागबीग ईसरून त्ये बांडं लागलं कनि, दाताड काढाय मोट्मोठ्यानि. मेंदुत जरा कमिऽच दिसातंय.

काल्हडा नं भावड्यानि मोबायील खिशातुन, आन जव्हा मला दाखावला.

"माउली माउली येवढया बारिला चुकी झाली पगा माव्ही. माफी करा राव. समदी गडबडच झाली राव्. यळंमाळं निस्तं उल्टंच व्हतय पगा आज्. लयी वायीटवंगाळ बोल्लो राव तुम्हाला. त्वांड झोडाय्चि बारी आली पगा माह्यावं." मोबायील आप्ला नाह्यिच म्हंगाल्यावं आता दुसरं कर्तो तरी काय म्या बाबुराव.

त्यान्हीबी माव्ही समजुत घातली,"पाव्हणं चालायचं राव. जाऊंदया वले. व्हती मिश्टिक येखाण्द्या टाय्माला.पह्यला तुमचा मोबायील घावतोय का नाय ते पगा"

आन्मंग आत्ताशि माव्ही टुप लागली. "आवं कोरटात वकिलानि त्ये डबडं सायलिन्स करून पिश्वितच ठु म्हनुन सांगातलं व्हतं, न्हायतं त्ये जजडं फायीन मारितंय म्हनुन हाग्या दम धिल्ता पगा. हाए वले पिश्वितच ह्ये त्ये डबडं."

त्ये इच्राय लागलं "कोरटात आल्थं काय तुम्ही?कुढुल्ल्लं ह्येत तुम्ही? "

"वाड्याचा ह्ये पगा मी. तिक्डं भिमाशंक्रापं ह्ये आम्चं वाडं." म्या सांगातलं.

"आन मी बी घोड्याचा ह्येना राव. मला वाटत व्हतंच ..सोयरं आपलंच दिसातंय म्हनुन. कापडं न बॉलणं श्येमच ह्ये न काय." त्ये म्हंगालं .

आत्याह्य्ला मजाच झाली न क्काय समदीच.तुम्ही मंबयीत काय करत्या? सरव्हीस ह्ये का काय?" म्या म्होरं चालु ठुलं .

त्ये,नाह्यी वो वाशिला मारक्येटला आल्थो.बट्ट्याचि पट्टि न्ह्यायचि पल्डि व्हती. लयी दी झाल्तं.तव्हा ती घित्लि न मण्ग आत्ता जरा लाल्बागला साडूपं जाऊन आलो जराशिक.त्येच्या पोरिच्या सोयरिकीचि गडबड चाल्लीय जरा,तव्हा गेल्थो जरा बोल्चाली कराया. तुम्ही कोरटात काह्याला. काय वाटपाचा लफ्डा ह्ये का काय? आपल्याभोति ती लयीच _टंउपट आस्ती पगा." "न्हाय वो. पुनरवसनाचं रखाडलंयना आमचं ईस वर्सापून्.तव्हा मारितोय चक्रा न काय ह्ये.पार कम्रंचा काटा ढील्ला पल्डा पगा ह्येल्पाटं घालुघालु.काम सुचानि का धाम सुचानि ह्या क्येशिपाई" मलाय्बी मन हाल्कं कराय लयी दी झाल्तं कोनच घावलं न्हव्हतं.

"चालाय्चंच वले.क्यालं तं पाय्शेनंच."त्यांन्हैबी माला आंजार्लं.

त्ये जाऊन्दे वले टिप्रित.गाय छाप तं आसनंचना तुमच्यापं.द्या यखांदा इडा न काय ह्ये.कोरटात जाय्चं म्हयी लयीच मुस्क्या आवळुन घ्याय्ची धन ह्ये न काय्.मोबायील नका न तम्बाखु खाउन थुकु नका.बोलु नका न खोलु नका.आन मंग कराय्चं तरी काय आम्ह्या तिधं जाऊन्.काय भिताडाला धडका घ्यायाच्या क्काय? म्हायी गाडी तं ढाळानि शम्भ्रानि सुटलि नं काय.

कोपरितुन पुडि काढित तो म्हंगाला,ही घ्या चुना न पुडि.बाकि बिजंचि जत्रा कशि काय झालि औन्दा?मलात काय जाया झालंच नाय पगा बिजलां.

आवं धरणात गाव उठल्यापुन श्योच गेलाना समदा जत्रंचा.उगंच आप्लि द्येवासाठि कराय्चि नं काय"म्या म्हंगालो.

"फुर्मोळ तं रेटला आसंनना दाबुन?"त्यान्हं इचार्लं.

"त्ये सोडितो का राव्.म्येथिचि भाजि,आंबिल, मलिदा नं घुगऱ्या. चार दि निस्ता धुराळा पग्.यळंमाळं रेमटित व्हतो." फुर्मोळांचं तं आपल्याला आझुकय्बि लयी आप्रुक.

"म्होर्ल्या बिजंला या आमच्यापं फुर्मोळाला" म्या आवातनं दिउन ठुलं.

नक्किच यानं कर्तो पगा बिजंला. त्यान्हैबी हामि धिलि. "सोय्रं, तुम्हियबि या कनि आमच्यापं येखान्दिशि.घर्च्याच कोम्ड्या ह्येत्.धसरु दोन्तिन आलं तुम्हि तं,पर वशाट चालातं नं तुम्हालां? नाह्यंतं शेंगुळि मास्वड्याच्या ब्येत उड्वुन दिउ तुमच्यासाठि. "

वशाट म्हंगाल्याव तं आप्ल्या मुखात तं लाळंचा पूरच पूर सुटाया लागतोय निऱ्हा."चालातं म्हयी काय पळातंय. बोंब्यील सुकाट आन्डी चिकाण मटान मछ्छि समदंच हानितो नं काय्ह्ये."

"मण्ग तं झालिच पगा बारि येत्या आखाडात आप्ल्या घराला."तोयबि मला घरि न्ह्येयाला लयीच घायीवं आल्था.

मण्ग आम्ह्या एक्मेकाण्णा लाव्-लम्बर दिउन ठुलं. निरोपय्बि घ्येतला. घाट्कोपर ठेसण तव्हर आलंय्बि.म्या आप्ला खालि उत्रून भट्वाडिच्या आण्गानि पावलं टाखाया सुर्वात क्येली.


  • च्यायला मिव्हं

हये इथं टाकून दोन दी झालं पर समदं बबं न बाया काय आम्चयांकं पगानिं.. निर्हा दोन दोन मिन्टानि पगून जात व्हतो.. पर कुनिबी आम्ह्या लिव्हलील्या वळींकं ध्यान द्याया माघानी.. म्हन्गालो जाउन्दे कनि गाढवाच्या गां_त.. आज एळभर काय टायिम गवासला नाय इथं पग्हाय.. (त्ये म्या औंदा आमच्या इथुल्ल्य्या रोट्री कलपचा आध्धेक्श झालो कनि. तव्हा आज्च्याला आम्ह्या रक्तदान शिबिराचि आरास्मेन्ट केल्थी. मोकार लान्डा गोळा झालिला..निर्ही जत्रा उलाथ्लेलि.समदं रेकाड ब्यरेक झालं... साडेसोळाशे बाटल्या गोळा केल्या कनि.) तं सवंसान्चा येऊन पगातलं तं निर्हा धुराळा.. कोन सोलापूर तं कोन सातारा तं कोन खान्देश च्यायला जाळ न धुर सन्गच.. आर पर तुम्ही वाचित्याय का का्य करित्याय?? गाव कुढुल्लं हये पुसल्यावं त्ये बांडं सान्गातं कनी म्यी भिमाशंक्रापसल्या वाड्याचा तं दूसरा सांगतो म्यी घोड्याचा. एवढ्यावं तुम्ह्या वळखाय पाय्शेन व्हतं.. हां म्हयी आदर्निय श्री.ब्याट मणभावू समदिकं फिरुफिरू बराबर आमच्या भ्यीमाशंक्राच्या पिण्डीवं पोहोच्ल्येलें ह्येत. आम्हि त्यान्चे मण:पुर्वक हार्दिक स्वागत करतो आभार मान्तो.. तव्हा या समदी आमच्या मावळात.. म्हयी ख्येड आम्बेगाव जूण्णर न शीरुळ तालुक्यात.

संदर्भ

संपादन