पुष्कर सिंह धामी

(पुष्कर सिंग धामी या पानावरून पुनर्निर्देशित)

पुष्कर सिंह धामी ( १ जानेवारी १९६१) हे भारत देशाच्या उत्तराखंड राज्यामधील एक राजकारणी व राज्याचे विद्यमान मुख्यमंत्री आहेत.

पुष्कर सिंह धामी

विद्यमान
पदग्रहण
४ जुलै २०२१
मागील तीरथ सिंह रावत

जन्म १६ सप्टेंबर, १९७५ (1975-09-16) (वय: ४९)
पिथोरागढ
राष्ट्रीयत्व भारतीय
राजकीय पक्ष भारतीय जनता पक्ष

राजकीय कारकीर्द

संपादन

धामी यांनी १९९० मध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची विद्यार्थी शाखा असलेल्या अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेतून राजकीय कारकिर्दीची सुरुवात केली. २००८ पर्यंत त्यांनी भारतीय जनता युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष म्हणूनही काम केले. या काळात, राज्यातील उद्योगांमध्ये स्थानिक तरुणांसाठी ७०% संधी राखून ठेवण्याचे राज्य सरकारचे श्रेय त्यांना देण्यात आले.[]२०१२ साली ते सर्वप्रथम उत्तराखंड विधानसभेवर निवडून आले. २०२१ साली तीरथ सिंह रावत यांच्या पद धारण करण्याच्या वैधतेबाबत निर्माण झालेल्या राजकीय संकटामुळे तीरथ सिंह रावत यांच्या राजीनाम्यानंतर पुष्कर सिंग धामी यांनी ४ जुलै २०२१ रोजी उत्तराखंडचे मुख्यमंत्री म्हणून पदभार स्वीकारला. २०२२ उत्तराखंड विधानसभा निवडणूकीमध्ये भारतीय जनता पक्षाला स्पष्ट बहुमत मिळाले तरीही धामी ह्यांना खटिमा मतदारसंघामधून पराभवाला सामोरे जावे लागले. परंतु उत्तराखंड भाजप समितीने त्यांनाच मुख्यमंत्रीपदावर कायम ठेवण्याचा निर्णय घेतला.

संदर्भ

संपादन
  1. ^ Livemint (2021-07-03). "Who is Pushkar Singh Dhami? All you need to know about the next Uttarakhand CM". mint (इंग्रजी भाषेत). 2022-01-14 रोजी पाहिले.