पुणे विद्यार्थी गृह
पुणे विद्यार्थी गृह ही महाराष्ट्रातील एक अग्रगण्य शैक्षणिक संस्था आहे. दादासाहेब केतकर यांनी १९०९ साली या संस्थेची सुरुवात केली.[१][२]
पुणे विद्यार्थी गृह | |
---|---|
अध्यक्ष | सुनील रेडेकर |
स्थापना | १२ मे १९०९ |
मुख्यालय | पुणे |
संकेतस्थळ | अधिकृत संकेतस्थळ |
इतिहास
संपादनपुणे (अनाथ) विद्यार्थी गृहाची स्थापना 12 मे 1909 रोजी झाली.[३] संस्थेची सुरुवात पुण्यातील सदाशिव पेठेतील चिमण्या गणपतीजवळच्या भट ‘वाडा’मध्ये अगदी लहानश्या जागेत झाली. संस्थेचे संस्थापक दादासाहेब केतकरांनी आपले संपूर्ण आयुष्य संस्थेच्या विकासासाठी समर्पित केले[४]. त्यांच्या नंतर संस्थेचे माजी विद्यार्थी गजानन श्रीपत उर्फ अण्णासाहेब खैर हे त्यात सामील झाले.[ संदर्भ हवा ] त्यांच्या अथक योगदानाने संस्था मोठी होत गेली. १९२१ मध्ये दादासाहेब केतकर, अण्णासाहेब खैरे आणि नानासाहेब परुळेकर यांच्या पुढाकाराने ‘महाराष्ट्र विद्यालय’ ही शाळा स्थापन झाली.[ संदर्भ हवा ]
संस्था कॅम्पस
संपादनपुणे - मुख्यालय
संपादन- महाराष्ट्र विद्यालय
- फाटक तंत्र निकेतन
- सदाचार विद्यार्थी वसतिगृह
पुणे - मुक्तागंण परिसर
संपादन- पुणे विद्यार्थी गृह अभियांत्रिकी महाविद्यालय,विद्यानगरी परिसर
- मुक्तांगण बालरंजन केंद्र
- अभियांत्रिकी विद्यार्थी वसतिगृह
मुंबई
संपादन- कै. डॉ. एस. व्ही. ऊर्फ काकासाहेब देवधर इंग्रजीमाध्यम शाळा (पूर्व प्राथमिक, प्राथमिक व माध्यमिक शाळा)
- पुणे विद्यार्थी गृह अभियांत्रिकी महाविद्यालय, नाशिक
- पुणे विद्यार्थी गृह व्यवस्थापन संस्था, नाशिक
- महाराष्ट्र विद्यालय, पंचवटी
- विद्यार्थी वसतिगृह, पंचवटी
नेरुळ
संपादनतळेगाव
संपादनसंचालक मंडळ
संपादनहनुमंत भोसले
कृष्णाजी कुलकर्णी
रमेश कुलकर्णी
राजेंद्र कांबळे
संदर्भ
संपादन- ^ वृत्तसेवा, प्रभात (2021-10-16). "विविधा : दादासाहेब केतकर". Dainik Prabhat (इंग्रजी भाषेत). 2022-08-31 रोजी पाहिले.
- ^ "पुण्यातील अनाथ विद्यार्थी गृहाचा आताचे पुणे विद्यार्थी गृह वर्धापनदिन". www.bytesofindia.com. 2022-08-31 रोजी पाहिले.[permanent dead link]
- ^ "An Earnest Appeal – Pune Vidyarthi Griha, 1786, Sadashiv Peth, Pune 411030 Maharashtra India". www.punevidyarthigriha.org. 2022-08-30 रोजी पाहिले.
- ^ "केतकर, विष्णू गंगाधर". महाराष्ट्र नायक (इंग्रजी भाषेत). 2022-08-31 रोजी पाहिले.
- ^ "Mhasrul – Pune Vidyarthi Griha, 1786, Sadashiv Peth, Pune 411030 Maharashtra India". www.punevidyarthigriha.org. 2022-08-30 रोजी पाहिले.
- ^ "Nashik – Pune Vidyarthi Griha, 1786, Sadashiv Peth, Pune 411030 Maharashtra India". www.punevidyarthigriha.org. 2022-08-30 रोजी पाहिले.