पीपल्स कॉलेज (नांदेड)

स्वामी रामानंद तीर्थ ह्यांनी १९५० मध्ये नांदेड एज्युकेशन सोसायटीची स्थापना करून नांदेड शहरात 2६ जून १९५० साली पीपल्स कॉलेज सुरू केले. कर्माचे डोळे ज्ञान ते निर्दोष होआवे हे नांदेड एज्युकेशन सोसायटीचे ब्रीदवाक्य आहे.

पीपल्स कॉलेजची उद्दिष्ट्ये

संपादन
  • गुणवत्तेवर आधारित शिक्षण देऊन तळागाळातील विद्यार्थ्यांना घडविणे
  • भारत देशासाठी विविध जबाबदाऱ्या स्वतःच्या खांद्यावर उत्तमरित्या पेलवण्यास सक्षम असणारे विद्यार्थी घडविणे
  • नैतिक आणि भौतिक निकोप,निरपेक्ष मूल्यांना सोबत घेऊन आनंदी व सक्षम भारतासोबतच वैश्विक शांतता, बंधुभाव, निर्माण करणारे विद्यार्थी घडविणे.

पीपल्स कॉलेजची ध्येये

संपादन
  • मुख्य प्रवाहांपासून दूर असलेल्या समुहांची आणि महिलांची शिक्षणाच्या माध्यमातून उन्नती करणे.
  • स्वावलंबन, प्रामाणिकपणाची शिकवण विद्यार्थ्यांमध्ये बिंबवणे
  • मानवतेच्या संकल्पनेचे बीजारोपण करणे.
  • लोकशाही आणि समाजवादी तत्त्वांवरची निष्ठारुजविणे
  • शाश्वत विकास आणि गुणवत्ता हे महाविद्यालयीन प्रत्येक कार्यातून वाढीस लावणे