पिलू नौशिर जंगलवाला (पूर्वाश्रमीच्या पिलू नाणावटी) या भारतीय शिक्षणतज्ज्ञ आहेत. या पार्झोर फाउंडेशन या संस्थेच्या अधिकारी असून त्या मुंबईतील विल्सन कॉलेजमध्ये प्राध्यापिका होत्या. त्या दिल्ली विद्यापीठाच्या मेमोरियल कॉलेजच्या प्राचार्याही होत्या. २००० साली भारत सरकारने त्यांना पद्मश्री पुरस्कार दिला.