पिरान्हा हा प्रामुख्याने गोड्या पाण्यात आढळणारा एक मासा आहे. चॅरॅसिडी मत्स्यकुलातील सेरॅसाल्मस वंशातील बऱ्याच जातींना पिरान्हा या नावाने ओळखले जाते. या माशाला टायगर फिश, पेराई, पिरायाकॅराइब ही पण इतर नावे आहेत. हे मासे मांसाहारी असून द. अमेरिकेत पूर्व व वायव्य भागांतील नद्यांत (उदा. अमेझॉनमध्ये) आढळतात.[]

मत्स्यालयात ठेवलेला एक पिरान्हा मासा

शरीररचना

संपादन

शरीर दोन्ही बाजूंनी पसरट व रुपेरी रंगाचे असते. डोके मोठे असून जबडे बळकट व दात तीक्ष्ण असतात.बहुसंख्य माशांची लांबी सुमारे ३५ सेंमी. असते; पण सर्वात मोठा मासा ६० सेंमी. पर्यंत लांब असतो. या माशांचे तोंड मिटलेले असताना वरचे करवतीसारखे दात खालच्या कातरीसारख्या दातांच्या विरुद्ध बाजूस येतात.

नदीच्या पाण्यात येणाऱ्या कोणत्याही प्राण्यावर ते झुंडीने हल्ला करतात व त्याचा फडशा पाडतात. त्यामुळे भक्ष्याचा फक्त सांगाडाच शिल्लक राहतो. काही वेळा या माशांनी माणसेही खाल्ली आहेत. लहान मासे हेच त्यांचे प्रमुख अन्न होय. भक्ष्याच्या वाहणाऱ्या रक्ताच्या वासाने ते इतके आकृष्ट होतात की, काही वेळातच शेकडो पिरान्हा गोळा होतात. गळाने मासेमारी करण्यात ह्यांच्यामुळे अडथळा येतो, कारण गळाला लागलेल्या माशावर ते हल्ला करतात. तीक्ष्ण दातांनी मासेमारी आकड्यांचे ते सहज तुकडे पाडतात.

संदर्भ

संपादन
  1. ^ http://mr.vikaspedia.in/rural-energy/environment/91c94893593593f93593f92792493e-92e93e938947/92a93f93093e92894d93993e-1