पाली, रायगड जिल्हा

(पाली, रायगड, महाराष्ट्र (गांव) या पानावरून पुनर्निर्देशित)

गुणक: 18°32′N 73°13′E / 18.54°N 73.22°E / 18.54; 73.22{{#coordinates:}}:एकाधिक प्राथमिक खूणपताका प्रति पान घेऊ शकत नाही.

  ?पाली
महाराष्ट्र • भारत
—  शहर  —

१८° ३२′ २८.९८″ N, ७३° १३′ ११.८७″ E

प्रमाणवेळ भाप्रवे (यूटीसी+५:३०)
जिल्हा रायगड
लोकसंख्या ८,१६७ (२००१)
बल्लाळेश्वराचे मंदिर

पाली हे महाराष्ट्राच्या रायगड जिल्ह्यातील एक गाव आहे. सरसगडच्या भव्य किल्ल्याची पार्श्वभूमी व अंबा नदीचे निसर्गरम्य सान्निध्य लाभलेले पाली हे अष्टविनायकांपैकी एक असलेल्या बल्लाळेश्वर गणपतीचे स्थान आहे. मंदिरातील प्रचंड घंटा चिमाजीअप्पांनी अर्पण केली आहे.

इतिहाससंपादन करा

शिवाजी महाराज यांनी १६५७ साली कोकणात उतरून सरसगड, सागरगड, सुधागड किल्ले जिंकले असा इतिहास आहे. जवळच्या पाच्छापूर गावी संभाजी राजे आणि औरंगझेबाचा मुलगा अकबर यांची ऐतिहासिक भेट झाली होती. [१]

प्रेक्षणीय स्थळेसंपादन करा

पाली-खोपोली रस्त्यावर शेमडी नजिक उंबरखिंड, जांभुळपाडय़ातील गणपती, कोंडगावचे धरण, नागशेत येथे खडसंबाळे लेणी, भेलीव येथील मृगगड, राजणकुंडजवळील कोंडजाईदेवी, वरदायनीदेवी, सिद्धेश्वर रस्त्यावरील एकवीस गणपती मंदिर, उन्हेऱ्याची व उद्धरची गरम पाण्याची कुंडे अशी काही ठिकाणे प्रसिद्ध आहेत.

संदर्भ व टीपसंपादन करा

  1. ^ ऐतिहासिक सुधागड-पाली