पालक पनीर
पालक पनीर हा पालक व पनीर वापरून केलेला पंजाबी खाद्यपदार्थ आहे.
पालक पनीर | |||||||
पर्यायी नावे | पालक पनीर | ||||||
---|---|---|---|---|---|---|---|
प्रकार | डिश | ||||||
जेवणातील कोर्स | मुख्य | ||||||
उगम | भारत | ||||||
प्रदेश किंवा राज्य | पंजाब | ||||||
द्वारे निर्मित | अज्ञात | ||||||
शोध लावला | अज्ञात | ||||||
अन्न बनवायला लागणारा वेळ | 15 मिनिटे ते 20 मिनिटे | ||||||
अन्न वाढण्याचे तापमान | गरम गरम | ||||||
मुख्य घटक | पालक, पनीर, हिरवी मिरची, लसूण | ||||||
सामान्यतः वापरले जाणारे साहित्य | जिरे, धने, गरम मसाला, | ||||||
भिन्नता | सामान्य | ||||||
अन्नाद्वारे प्राप्त ऊर्जा (प्रती 100 ग्रॅम ) | 183 किलो कॅलरी (766 किलो जुल)nutritionix | ||||||
पौष्टिक मूल्य (प्रती 100 ग्रॅम) |
| ||||||
तत्सम पदार्थ | आलू पालक | ||||||
साहित्य :
- तेल
- पालक १ जुडी
- जिरे पूड
- धणे पूड
- हळद
- लाल तिखट
- गरम मसाला
- मीठ
- पनीर
- कसुरी मेथी
कृती :
एक चमचा तेल तव्यामध्ये गरम करावे. लहान आकाराचे टोमॅटो बारीक करून त्यामध्ये घालावे व एक हिरवी मिरची बारीक चिरून त्यामध्ये घालावी. नंतर त्यावर झाकण घालून मंद आचेवर शिजू द्यावे. २-३ मिनिट मिश्रण मऊ होईपर्यंत मंद आचेवर ठेवावे.
पालकाची पाने स्वच्छ धुऊन बारीक कापून घ्यावी व ती कढईमध्ये टाकावी. अर्धा कप पाणी घालावे व ३-४ मिनिट मंद आचेवर शिजवून घ्यावे. थोड्या वेळाने ते थंड झाल्यावर मिक्सर मध्ये बारीक करून घ्यावे.
नंतर जिरे पूड १/२ चमचा, धणे पूड १ चमचा, हळद १/२ चमचा, लाल तिखट १ चमचा, गरम मसाला १ चमचा, मीठ चवीपुरते मिसळून घ्यावे व त्यामध्ये ४-५ चमचे पाणी मिसळून त्याचे मिश्रण बनवावे. तव्यात १ चमचा तेल घालून त्यामध्ये हे मिश्रण मंद आचेवर तेल सुटेपर्यंत परतून घ्यावे तसेच १ चमचा जिरे घालावे, १ चमचा लसूण पूड घालावी व पालक बारीक केलेला त्यामध्ये मिसळून मंद आचेवर ठेवावे व दोन मिनिट परतून घ्यावे. नंतर त्यामध्ये चवीपुरते मीठ घालावे, २ चमचे बटर घालावे. २ चमचे साय घालावी. ते मिश्रण मंद आचेवर पारतून घ्यावे. २५० ग्रॅम पनीर घालावे व मंद आचेवर १०-१५ मिनिट ठेवावे. तुमचे पालक पनीर तयार झाले.